OnePlus Open देणार Samsung Galaxy Z Fold 5 तगडी टक्कर! भारतात लवकरच होणार वनप्लस फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च

OnePlus Foldable Smartphone Launch : OnePlus ही कंपनी भारतात तसेच जगभरात आपल्या स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध आहे.
OnePlus Open Launch
OnePlus Open Launch Saam Tv
Published On

New Foldable Smartphone Launch :

OnePlus ही कंपनी भारतात तसेच जगभरात आपल्या स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध आहे. कंपनी त्यांच्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोन (Smartphone) लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. हा डिवाइस 19 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल.

OnePlus Open हा कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन आहे. ज्याची अधिकृत लॉन्च होण्याची तारीख जाहीर झाली आहे. हा डिवाइस भारतात 19 ऑक्टोबरला लॉन्च होणार आहे. सॅमसंग फोल्डेबल फोन मार्केटमध्ये वर्चस्व गाजवत आहे, परंतु आता वनप्लस त्याच्याशी स्पर्धा करणार आहे.

या डिव्हाइसचे फीचर्स आणि किंमत लॉन्च (Launch) होण्यापूर्वीच ऑनलाइन लीक झाली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात.

OnePlus Open सगळ्यात हलके असेल

  • लॉन्चच्या आधी या टेक कंपनीने यावर जोर दिला होता की हे उपकरण वापरकर्त्यांना जलद आणि सहज परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन केले आहे.

  • OnePlus चा फोल्डेबल फोन (Phone) हलका असून त्याची रचना देखील स्लिम असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

  • याशिवाय OnePlus ओपनमध्ये स्क्रीनवर कोणतेही स्क्रॅच दिसणार नाहीत. याच्या कॅमेऱ्याचा परफॉर्मन्सही खूप चांगला असल्याचं म्हटलं जात आहे.

  • कंपनीचे म्हणणे आहे की हा फोल्डेबल स्मार्टफोन वनप्लस ओपन ऑल-राउंडर फ्लॅगशिप-लेवल एक्सपीरिएंस देण्यासाठी डिझाइन केला गेला आहे.

OnePlus Open Launch
OnePlus Nord Launch: OnePlus Nord CE3 5G लॉन्च ! मिळतोय Snapdragon 782 प्रोसेसर व 5000mAh बॅटरीसह, जाणून घ्या किंमत

किंमत

अनेक ऑनलाइन रिपोर्ट्समध्ये माहिती मिळाली आहे की OnePlus Open ची किंमत $1,699 म्हणजेच जवळपास Rs 1,41,490 असू शकते.

OnePlus Open Launch
Samsung आणि OnePlus ने उडवली iPhone 15 ची खिल्ली, म्हणाले...

स्पेसिफिकेशन्स

  • या डिवाइसचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. OnePlus च्या या फोल्डेबल फोनमध्ये तुम्हाला 7.8 इंचाची मोठी स्क्रीन मिळेल, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाईल. त्याचा बाह्य डिस्प्ले 6.3 इंचाचा असेल.

  • या डिवाइस मध्ये तुम्हाला Qualcomm चा फ्लॅगशिप Snapdragon 8 Gen 2 चिपसेट प्रोसेसर मिळेल, जो 18 GB रॅम आणि 512 GB इंटरनल स्टोरेजसह पेअर केला जाऊ शकतो.

  • कंपनीने शेअर केलेल्या टीझरमध्ये एक अलर्ट स्लाइडर देखील असेल असे समोर आले आहे. याशिवाय, फोल्डेबल फोन गॅपलेस हिंग डिझाइनसह येऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com