PM Mudra Scheme : केंद्र सरकार आपल्यासाठी नवनवीन योजना आणत असते. अशातच केंद्र सरकारने 8 एप्रिल 2015 रोजी पीएम मुद्रा कर्ज योजना सुरू केली होती. या योजने अंतर्गत छोट्या व मोठया उद्योजकांना यातून कर्ज घेता येते
या योजने अंतर्गत सरकारने २३.२ लाख कोटी रुपयांची (Money) रक्कम मुद्रा लोन मार्फत देण्यात आली आहे. तसेच या योजने अंतर्गत ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज (Loan) दिले जाते.
1. कर्ज कसे मिळते ?
या योजनेंतर्गत नागरिकांना मिळणारे कर्ज हे तीन विभागात विभागले जाते. तर शिशू कर्जाअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर्ज घेता येते. लहान मुलांच्या नावाने कर्ज घेतल्यास ५० हजार पेक्षा जास्त व ५ लाख रुपयांपेक्षा कमी असते. तर तरुण वयोगटात ५ लाखांपासून ते १० लाखांपर्यंत कर्ज मिळते.
2. कोणाला घेता येईल या कर्जाचा लाभ ?
भारतीय व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यवसाय सुरु करणाऱ्याला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेअंतर्गत उत्पादन, व्यापार व सेवा क्षेत्रात असणारे कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय किंवा कृषी संबंधित काम करणाऱ्या लोकांना कर्ज घेता येऊ शकते. तसेच या लोनची किंमत ही आरबीआयद्वारे ठरवली जाते.
3. कर्ज कसे मिळवायचे ?
हे कर्ज मिळविण्यासाठी कागदपत्रे, हमी किंवा सुरक्षा जमा करण्याची गरज नाही. हे कर्ज बँक व NBFC द्वारे मिळते. अर्जदाराच्या सामान्य माहितीशी संबंधित कागदपत्रांव्यतिरिक्त, आपल्याला मुद्रा कर्ज घेण्यासाठी तुम्हाला नव्या व्यवसायाची योजना तयार करावी लागेल. बँक अर्जदाराकडून प्रकल्प अहवाल, भविष्यातील उत्पन्नाच्या अंदाजाशी संबंधित कागदपत्रे इत्यादी देखील मागू शकते. तुम्ही बँकेच्या (Bank) शाखेत जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकता.
4. व्याजाचा दर काय आहे ?
मुद्रा कर्जाचा एकसमान व्याजदर नाही. प्रत्येक बँक आपापल्या परीने व्याज आकारते. साधारणपणे, व्याजाचे निर्धारण कर्जाची रक्कम आणि व्यवसायाच्या स्वरूपावर अवलंबून असते. मुद्रा कर्ज 10-12 टक्के वार्षिक व्याजदराने उपलब्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.