Types Of Good And Bad Loans : सध्या कर्ज काढण्यासाठी पूर्वीसारखे तासंतास रांगेत उभे राहावे लागतं नाही. हल्ली डिजीटलायझेशनमुळे बँकेचा व्यवहार हा अधिक सोपा व सुलभ झाला आहे. तसेच जर तुम्ही बँकेतून कोणतेही कर्ज घेत असाल तर त्याबद्दल तुम्हाला थोडी फार तरी माहीती असणे आवश्यक आहे.
हल्ली बँक (Bank) आणि इंशॉरन्स कंपन्यांकडून अॅड्रॉइड अॅपद्वारे अतिशय कमी कालावधीत सहज कर्ज काढून दिले जाते. कर्ज प्रक्रिया सोपी झाल्याने अनेक जण आर्थिक उणीव भासल्यावर लगेच कर्ज (Loan) काढायला धावतात. यावेळी कर्जामागचे नुकसान त्यांच्या लक्षात येत नाही आणि कर्जाच्या विळख्यात गुंतत जातात. चांगले आणि वाईट कर्ज यातील फरक न कळल्याने अनेक जण मोठ्या परतफेडीस सामोरे जातात. काय आहे 'गुड आणि बॅड' लोन जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर
1. गुड कर्ज म्हणजे काय?
ज्या कर्जामुळे आपली संपत्ती कमी न होता वाढते त्या कर्जास चांगले कर्ज (GOOD LOAN)असे म्हणतात. ज्या कर्जामुळे आपल्या संपत्ती आणि करिअरमध्ये (Career) सकारात्मक वाढ होते. ज्या कर्जामध्ये परतावा दर हा त्यावर घेण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असते ते कर्ज चांगले कर्ज मानले जाते. यात शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, गृहकर्ज इत्यादींचा सामावेश असतो.
2. बॅड कर्ज म्हणजे काय?
ज्या कर्जामध्ये कर्जदारास व्याजा व्यतिरीक्त वाजवी रक्कम भरावी लागते त्याला वाईट कर्ज असे म्हणतात. या प्रकारच्या कर्जात कर्जदारास आणि कधी-कधी बँकेला देखील नुकसानास सामोरे जावे लागते. वाईट कर्ज बुडण्याची भीती बँकाना जास्त असते. तर, व्याजदर अधिक असल्याकारणाने व्याजासोबत भराव्या लागणारी अतिरीक्त रक्कम भरताना कर्जदाराची दमछाक होते. यात वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडीट कार्डवरील कर्ज, एखाद्या महागड्या वस्तूवरील कर्ज इत्यादींचा सामावेश असतो.
3. कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवा :
कर्ज घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज घेण्याइतपत परिस्थिती ओढावली आहे का? या व्यतिरिक्त कोणता उपाय आहे का? या गोष्टींचा विचार करुनच कर्ज घेण्याचा धोका पक्तरावा. तुम्हाला हवे तेवढे आणि बँका देतील तेवढे कर्ज तुम्ही घेऊ शकता. पण कर्ज घेताना एक दिवस हे उसणे घेतलेले पैसे आपल्यालाच चुकते करायचे आहेत नाहीतर गहाण ठेवलेली वस्तू गमवावी लागेल. या गोष्टीचा विचार करावा. त्यामुळे बचतीची व गुंतवणुकीची सवय लाभदायक ठरते. तुमच्या नफ्याच्या प्रमाणात 30 ते 40 कर्ज घेणे सर्वात फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या बजेटवर फारसा परिणाम होत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.