UPI Payment Using Credit Card : आता क्रेडिट कार्डनेही करता येणार UPI पेमेंट ! या 5 स्टेप फॉलो करा

Credit Card Link : तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड तुमच्या UPIला लिंक करावे लागणार आहे.
UPI Payment Using Credit Card
UPI Payment Using Credit Card Saam Tv

Credit Card Link To UPI : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) आजच्या काळातील डिजीटल ट्रांझेशनची सर्वात सोपी पध्दत म्हणून वापरले जाते. UPI हे कॅशलेस व्यवहाराचे साधन असून, याच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती अगदी केव्हाही आणि कुठेही पेमेंट करु शकते. भारतात डिजिटलायझेशनला चालना मिळावी याकरिता मनी ट्रांसफरींगच्या या पर्यायाला पाहिले जाते.

UPI ने आपण काही सेकंदात पैशांची (Money) देवाण-घेवाण करु शकतो. आतापर्यंत हा पर्याय फक्त डेबिट कार्ड पूरताच मर्यादित होता. परंतु आता क्रेडिट (Credit) कार्डने देखील UPI पेमेंट केले जाऊ शकते. तुम्ही आपल्या क्रेडिट कार्डला भीम (BHIM), पेटीएम (Paytm), फोन पे (Phone Pe) सारख्या UPI अॅनेबल्ड एप्सच्या माध्यमातून वापरु शकता.

UPI Payment Using Credit Card
How To Increase Cibil Score: कर्ज घ्यायचयं? पण क्रेडिट स्कोर बिघडलाय ? कसा सुधारवाल तुमचा 'क्रेडिट स्कोर'

1. कोण कोणत्या बँकेच्या क्रेडिट कार्डने करता येईल पेमेंट ?

अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि कनारा बँक ऑफ क्रेडिट कार्ड धारकांना ही सुविधा मिळणार आहे. या बँकांतील कार्ड धारक आपले क्रेडिट कार्ड यूपीआय अॅप्सला लिंक करु शकतात आणि आपला व्यवहार सुरू करु शकतात.

2. क्रेडिट कार्ड लिंक (Link) कसे कराल ?

या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही आपल्या क्रेडिट कार्डला UPI सोबत लिंक करु शकताः

1. सर्वप्रथम तुम्हाला भीम, फोन पे, पेटीयम, मोबिक्विक सारख्या कोणत्याही एका डिजीटल पेमेंट अॅपला डाउनलोड करायचे आहे.

2. यानंतर तुम्हाला या अॅपमध्ये आपले डिटेल्स टाकून लॉग-इन करायचे आहे. तुम्हाला या अॅपवर नोंदणी करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही.

UPI Payment Using Credit Card
Which Debit-Credit Card Use : तुम्ही कोणतं Debit-Credit कार्ड वापरता ? गोल्ड, प्लॅटिनम की, टायटॅनियम ?

3. नोंदणीनंतर तुम्हाला पेमेंटसाठी तुमच्या बँकेला निवडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाइल वरुन लिंक क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडायचा आहे. येथे मोबाइल नंबर टाकताना आपण टाकत असलेला नंबर तुमच्या बँकेशी रजिस्टर आहे का याची काळजी घ्यावी.

4. यानंतर तुम्हाला यूपीआय पिन जनरेट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड अकाऊंट निवडायचे आहे.

5. पुढे तुम्हाला तुमचा यूपीआय पिन सेट करा हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड वरील शेवटचे 6 अंक आणि कार्डची एक्सपायरी डेट टाकायची आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com