What is gaslighting Relationship Google
लाईफस्टाईल

Relationship Tips: नात्यातील गॅसलाइटिंग म्हणजे काय? 'या' गोष्टींमधून मिळतात संकेत, नेमका काय आहे प्रकार?

What is gaslighting Relationship: गॅसलाइटिंगची ओळख टॉक्सिक रिलेशनशिपने होत असते. जर तुमचा पार्टनर तुमच्या नात्यात त्याची जाण करून देत असेल तर तुम्हीही याचे शिकार आहात.

Bharat Jadhav

तुमच्या नात्यातही गुंतागूंत आहे? तुम्ही स्वता:वरच प्रश्न उपस्थित करत आहात का? तुम्ही इतर गोष्टी चुकीच्या समजत आहात का? जर या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर तुमचा पार्टनर गॅसलाइट तयार करत आहे, हे समजावं. गॅसलाइटिंग हा भावनिक शोषणाचा एक प्रकार आहे. यात तुमचा जोडीदार तुमच्या खरेपणाच्या धारणेला तोडण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमकुवत होतो आणि तुम्ही नेहमी नियंत्रणात राहता. अनेकवेळा लोकांना याची माहितीही नसते, त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या नात्यात हे ५ संकेत मिळत असतील तर सावधान.

काय आहेत गॅसलाइटिंगची लक्षणं

तुमचा पार्टनर तुमच्या आठवणी किंवा अनुभव सतत नाकारतो का? उदाहरणार्थ, तुम्ही त्यांना संभाषणाबद्दल सांगितल्यानंतर तुमच्या जोडीदाराने असं कधीच झालं नाही, असं म्हणत असेल तर? हे गॅसलाइटिंगचे संकेत आहे. तुम्ही वेडे आहात किंवा तुमची स्मरणशक्ती कमी आहे असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न तुमचा जोडीदार करत असतो.

तुम्ही खरे बोलत आहात हे माहीत असूनही तुमचा जोडीदार तुमच्यावर खोटे बोलण्याचा किंवा गोष्टींमध्ये गोंधळ घालण्याचा आरोप लावत असेल. तसेच तुमच्या प्रामाणिकपणावर शंका घेऊन ते तुम्हाला असुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात.

बऱ्याचवेळा तुमचा पार्टनर तुमच्याशी बोलणे थांबवतो. तुम्हाला शिक्षा करण्यासाठी तुमच्याकडे दुर्लक्ष करतो. असे केल्याने तो तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत करतो. तुम्हाला त्याच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचा जोडीदार तुमच्या निर्णयांना महत्वहीन किंवा मूर्ख म्हणत असतो. त्यामुळे तुम्हाला, असं वाटतं की तुम्ही काहीही योग्य करू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या जोडीदाराची मंजुरी घ्यावी असं तुमच्या जोडीदारला वाटत असतं.

तुमचा पार्टनर नेहमी त्याच्या चुकांसाठी तुम्हाला दोष देत असतो. ते गोष्टी वळवून ते तुम्हाला त्या गोष्टीसाठी जबाबदार धरत असतात. तुम्हाला यापैकी कोणतेही संकेत मिळत असेल तर मित्र, कुटुंब सदस्य किंवा मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी बोला. ते तुम्हाला परिस्थिती समजून घेण्यात आणि त्या परिस्थितीला कसे सामोरे जावे याचा सल्ला देत देऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लज्जास्पद! बॉयफ्रेंडसोबत डिनर, निर्जनस्थळी शरीरसंबंध ठेवले, मित्रही पोहचले; पोलीस कॉन्स्टेबल महिलेवर तिघांचा बलात्कार

Alu Vadi Recipe: आज दुपारच्या जेवणासाठी घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट खमंग अळू वडी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

शेतीपुरक व्यावसायिक महिलांना 'शेतकरी दर्जा' ? पावसाळी अधिवेशनात मांडणार विधेयक?

एलॉन मस्क यांनी रचला इतिहास, मस्क बनले जगातील पहिले ट्रिलिनियर

SCROLL FOR NEXT