Relationship Tips: पार्टनर लग्नासाठी तयार आहे की नाही? 'या' ७ संकेतावरुन समजेल त्याच्या मनातली गोष्ट

Relationship Tips: जेव्हा दोन व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा त्यांना एकमेकांबद्दल बरेच काही गोष्टी माहिती होत असतात. दररोज ते त्यांच्या जोडीदाराबद्दल काहीतरी नवीन गोष्टी जाणून घेत असतात. मात्र एकत्र राहिल्यानंतरही त्यांचा जोडीदार त्याच्याशी लग्न करणार की नाही याविषयी ते शाश्वत नसतात.
Relationship Tips: पार्टनर लग्नासाठी तयार आहे की नाही? 'या' ७ संकेतावरुन समजेल त्याच्या मनातली गोष्ट
Relationship TipsGoogle

प्रेमाचं नातं हे एका नाजूक धाग्याने बांधलेले असते. या नात्याला शंकेच्या किडीने ग्रासल तर हे नातं तुटण्यास वेळ लागत नाही. जर तुम्ही हे नाते पूर्ण प्रामाणिकपणे निभावले तर तुम्ही आयुष्यभर आनंदी राहतात. परंतु तुमच्या जोडीदाराला तुमच्याशी लग्न करायचे आहे की नाही हे तुम्हाला कसं कळेल? जोडीदार आपल्यासोबत लग्न करेल की, नाही हे याची खात्री अनेकांना नसते. त्यामुळे आज आपण अशा गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यातून जोडीदार त्याच्या वचनावर टिकणार की नाही हे समजेल. तुमचा पार्टनर हा तुमच्याशी लग्न करण्यास इच्छुक आहे का नाही हे तुम्ही काही संकेतावरुन जाणून घेऊ शकतात.

भविष्याबद्दल बोलत असेल तर

रिलेशनशिप तज्ज्ञांच्या मते, जर तुमचा पार्टनर तुमच्याशी लग्न करू इच्छित असेल तर तो तुमच्याशी भविष्याबद्दल नक्कीच बोलेल. जसे की तुम्ही भविष्यात कुठे राहाल, सुट्टीत कुठे जाणार आहात किंवा तुम्हाला किती मुले हवी आहेत इत्यादी. जर तुमच्या जोडीदारानेही तुम्हाला हे प्रश्न विचारले असतील तर तो तुमच्याशी लग्न करेल याची शक्यता जास्त असते.

सल्ला घेणे

एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा तुमच्याशी करत असेल, तर तो तुम्हाला आपलं समजत असतो. तुमच्यावर त्याचा विश्वास असतो, तुमच्याशी त्याचं जिव्हाळ्याचं नातं मानत असतो. जर तुमचा जोडीदार तुमच्याकडून छोट्या-छोट्या गोष्टींवर सूचना, सल्ला घेत असेल किंवा कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्याशी बोलत असेल तर त्यालाही तुमच्याशी लग्न करायचं आहे, हे सिद्ध होत असतं.

कुटुंब आणि मित्रांना भेटणे

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या नात्याबद्दल आत्मविश्वास बाळगते तेव्हाच तो आपल्या जोडीदाराची त्याच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबाशी ओळख करून देतो. तुमचा जोडीदार तुमच्याशी लग्न करणार आहे का नाही हे या संकेतावरुन कळते. त्याच्या घरातील व्यक्ती तुमची ओळख करुन देत असेल तर हे सर्वात मोठं संकेत असते.

पैशाची चर्चा

पैसे आणि बँक बॅलन्सची चर्चा करणे हे सूचित करते की तुमचा पार्टनर तुमच्यासोबत भविष्याची योजना करत आहे. भविष्यात या गोष्टींबाबत कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी तो आधीच या गोष्टींबद्दल बोलत असतो.

लग्नाबद्दल बोलत असेल तर

तुमचा जोडीदार तुमच्याशी लग्नाबद्दल तेव्हाच बोलेल जेव्हा तो नातेसंबंधाबद्दल त्याच्या मनात स्पष्टता असेल. जर त्याला तुमच्याबद्दल शंका असेल तर तो तुमच्याशी असे बोलणार नाही.

अंगठी चर्चा

तुमचा पार्टनर तुम्हाला वचन देतो की, तो तुमच्यासोबत आयुष्यभर असेल. याशिवाय जर त्याने तुम्हाला विचारले की तुम्हाला कोणत्या प्रकारची अंगठी हवी. किंवा तुम्हाला एक अंगठी भेट म्हणून देईल. तर या सर्व गोष्टी सूचित करतात की तुमचा पार्टनर तुमच्याशी लग्न करण्यास गंभीर आहे.

घरगुती बाबींवर सल्ला घेणे

जर तुमचा जोडीदार त्याच्या घराशी संबंधित बाबींवर तुमचे मत घेऊ लागला. तर समजा त्याने तुम्हाला त्याच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून स्वीकारले आहे. जर एखादा व्यक्ती कुटुंबीय बाबी तुमच्याशी चर्चा करत असेल तर तो तुमच्याशी लग्न करण्यास इच्छुक असल्याचं समजावं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com