Summer Health Google
लाईफस्टाईल

Summer Health: कडक उन्हाळ्यात फक्त पाणी पिऊन चालणार नाही, खा 'हे' पदार्थ अन् राहा हायड्रेटेड

Summer Hydration Tips: उन्हाळा आला की, शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामध्ये तुम्ही काकडी, टरबूज, कलिंगड, दही, नारळपाणी, पुदीना, बडीशेप यांचा समावेश करता.

Saam Tv

आता कडाक्याच्या उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. काही दिवसात उन्हाचे तापमान अधिक वाढेल. तुम्ही उन्हाळ्यात सगळ्यात जास्त प्रमाणात हायड्रेटेड राहणे गरजेचे असते. अन्यथा तुम्हाला थकवा, अशक्तपणा, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या आहाराकडे सुद्धा विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. आहारामध्ये तेलकट, तिखट खाणे टाळले पाहिजे. तसेच अधिक फळांचा आहारात समावेश केला पाहिजे. पुढे आपण उन्हाळ्यात हेल्दी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी कोणते पदार्थ खायचे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

उन्हाळ्यात कोणते पदार्थ खावेत? (summer hydrating foods)

उन्हाळा आला की, शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामध्ये तुम्ही काकडी, टरबूज, कलिंगड, दही, नारळपाणी, पुदीना, बडीशेप यांचा समावेश करतो. यामध्ये तुम्ही तुमच्या आहारात भाज्यांचा समावेश असणे सुद्धा महत्वाचे असते. त्यामध्ये कांदा हा खूप फायदेशीर मानला जातो. कांदा उष्माघातापासून तुमचे संरक्षण करतो. अशा अनेक भाज्या उन्हाळ्यात खाणे फायदेशीर ठरू शकते. पण भाज्या ज्यास्त प्रमाणात तिखट नसाव्यात.

उन्हाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत?

उन्हाळा आला की, तेलकट, बाहेरचे शिळे अन्न, फास्टफूड, झणझणीत पदार्थ टाळावेत. कारण तुम्हाला हे पदार्थ खाऊन पित्त, अपचन, गॅसचा त्रास होऊ शकतो. शीतपेयं घेणे शक्यतो टाळावे. त्याने तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाहीत. मासे, अंडी, मांसाहार कमी असावा. लोणचे, चटण्या, चहा-कॉफी असे पदार्थ खाणे टाळावे.

उन्हाळ्यात हायड्रे़टेड राहण्यासाठी कोणते पदार्थ खाणे गरजेचे आहे?

लिंबू पाणी (fresh lime benefits)

लिंबू पाणी हे पेय आपण उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पितो. यामध्ये तुम्ही साखर कमी प्रमाणात वापरावी. अन्यथा तुम्हाला त्याचा पुरेसा फायदा मिळत नाही. शिवाय लिंबू पाणी तयार करताना, त्यामध्ये लिंबाचा रस, साखर, मीठ, पुदीना, सब्जा या औषधी पदार्थ किंवा वनस्पतींचा समावेश असावा. हे पेय चवीला उत्तम असतेच. त्यामुळे जास्त पाणी आपल्या शरीरात जाते.

कलिंगड ( watermelon benefits)

उन्हाळा आला की, बाजारात कलिंगड सहज उपलब्ध होते. कलिंगडाचे सेवन केल्याने शरीराला असणाऱ्या आवश्यक पाण्याची समस्या दूर होते. तसेच शरीर डिहाड्रेशन होण्यापासून वाचते. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम या गुणधर्मांचा समावेश असतो. त्याने शरीरातले टॉक्सिंस बाहेर येण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

SCROLL FOR NEXT