Kitchen tips and tricks in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

अन्नपदार्थात हळद अधिक प्रमाणात पडल्यास काय कराल ?

जेवणात हळद जास्त झाल्यास काय कराल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हळद आरोग्यासाठी (Health) फायदेशीर आहे. त्यातील प्रतिजैविक गुणधर्म आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. हळदीत अनेक एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत. आयुर्वेदातही हळदीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (Kitchen tips and tricks in Marathi)

हे देखील पहा-

स्वयंपाक (Kitchen) करताना बरेचदा आपल्या हातून काही पदार्थ (Food) अनवधाने जास्त पडले जातात. काहीवेळी पदार्थाची चव टिकवण्यासाठी आपण अनेक मसाले कमी जास्त टाकतो. परंतु काही पदार्थ चुकून जास्त पडले तर ते चव खराब करते. दही, पिठाच्या गोळ्यांनी मीठ आणि मिरचीसारख्या घटकांचा समतोल राखता येतो, पण जर हळद जास्त पडली तर तो पदार्थ कडवट बनतो. त्याच्या चवीमुळे जेवणात वास येऊ लागतो आणि तो पदार्थ अजिबात खाल्ले जात नाही. हळद जास्त पडल्यास आपण काय करायला हवे हे पाहूया.

या पदार्थाचा वापर करा-

१. आपल्या जेवणात हळद जास्त झाली असेल व त्याची चवही कडू लागत असेल तर त्यात नारळाचे दूध घालून थोडा वेळ शिजवा. यामुळे आपल्या डिशला अनोखी आणि स्वादिष्ट चव तर येईल तसेच हळदीचा कडूपणाही दूर होईल.

२. वाढलेल्या हळदीची चव कमी करण्यासाठी आपण आमचूर पावडर किंवा आवळा पावडर देखील घालू शकतो. याशिवाय चिंचेची पेस्ट किंवा त्याची पावडरही वापरता येईल.

३. ग्रेव्ही बनवताना हळद जास्त पडली असेल, तर त्यातील भाजी वेगळी करून त्यात पाणी, मीठ आणि दही घालून ग्रेव्ही शिजवून घ्या. यामुळे हळदीचा कडूपणाही काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

४. आपल्या जेवणात हळद आणि मीठ दोन्ही जास्त झाले असेल तर आपण कच्च्या बटाट्याचे तुकडे करुन ते ग्रेव्हीमध्ये ठेवा. मंद आचेवर ५ मिनिटे शिजवा. बटाटा हळद आणि मीठ शोषून घेईल आणि कडूपणाही निघून जाईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

SCROLL FOR NEXT