Frozen Peas  Saam Tv
लाईफस्टाईल

Frozen Peas : पावसाळ्यात तुम्हीही आहारात फ्रोझन वाटाणे वापरताय? तर होऊ शकते गंभीर नुकसान

Helth Care Tips: आपण दरवेळी अनेक पदार्थ खात असतो, त्यात अनेकवेळा वाटाण्याचाही समावेश असतो. मात्र सध्या बाजारात फ्रोजन वाटाणे मिळतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्यापैंकी प्रत्येकाच्या आहारात वाटाणा या भाजीचा समावेश असतो. अनेकवेळा वाटाण्यापासून तयार केलेले विविध पदार्थ व्यक्तींना खाण्यास आवडतात. मात्र हिरव्या वाटाणे पावसाळ्यात आपल्याला मोजक्याचे ठिकाणी ताजे हिरवेगार असे मिळतात. अन्यथा फ्रोझन केलेले वाटाणे बाजारातून विकत घेतात काही लोक. मात्र फ्रोझन वाटण्याची चव ही खऱ्या वाटाण्यासारखी असते मात्र व्यक्तीच्या आरोग्यासाठी फ्रोझन वाटाणे चांगले नसतात.

अनेकदा बाजारात किंवा आपल्या परिसरात वाटाणे मिळत नसल्याने काहीजण फ्रोझन वाटाण्याचा वापर करतात. फ्रोझन वाटाण्याचा आहारात अनेकदा समावेश केल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला फ्रोझन वाटाणे खाण्याचे नुकसान (damage)माहिती नसल्यास तुम्ही आम्ही सांगत असलेली माहिती नक्की वाचा.

फ्रोझन वाटाणे खाण्याचे दुष्परिणाम कोणते ?

वजन वाढ

जर तुम्ही फ्रोझन वाटाण्याचा आहारात समावेश केल्यास वजन (weight)वाढण्याची समस्या वाढते. कारण फ्रोझन वाटाणे अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी स्टार्चचा वापर केला जातो परिणामी त्याचा परिणाम हा वजन वाढीवर होतो. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर फ्रोझन वाटाण्याचा आहारात समावेश करु नका.

पौष्टिक कमतरता

फ्रोझन वाटाण्यात कधीही विविध पौष्टिक गुणधर्मांची कमतरता आढळून येते. फ्रोझन वाटाणे जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषक घटक निघून जातात.जर तुम्ही लहान मुलांसाठी वाटाण्यापासून कोणताही पदार्थ करणार असाल तर फ्रोझन वाटाण्याचा वापर करु नये.

मधुमेह आणि बीपीच्या रुग्णांसाठी

जर तुमच्या घरात मधुमेह(diabetes) आणि बीपीचे सदस्य असतील तर त्यांच्या आहारात फ्रोझन वाटाण्याचा समावेश करु नका. कारण फ्रोझन वाटाण्यात स्टार्च असल्याने रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढते. त्यामुळे शक्यतो फ्रोझन वाटाण्याचा आहारात समावेश करु नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT