High blood pressure SAAM TV
लाईफस्टाईल

High Blood Pressure: BP तपासताना केली जाणारी ही एक चूक वाढवते हार्ट अटॅकचा धोका

BP Mistakes: ब्लड प्रेशर मोजताना होणाऱ्या सामान्य चुका तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करु शकतात. योग्य पद्धतीने bp तसासण्याचे नियम जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना काही जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यात लोक इतके आळशी झालेत की, त्यांना व्यायाम करणं फार कठीण वाटतं. त्यांच्याकडे चांगल्या आणि शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या सवयी फॉलो करायला वेळच मिळत नाही. पण सोशल मीडियावर वेळ घालवायला जमतं. पण याच सोशल मीडियावर काही महत्वाचे आणि हेल्थ संबंधीत व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये खूप महत्वाचीही माहिती मिळू शकते. पुढील माहितीत आपण ब्लड प्रेशर मोजताना करणारी मोठी चूक आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

जेव्हा ब्लड प्रेशर(High Blood Pressure) वाढतं, तेव्हा तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो. यामध्ये तुमचा जीव सुद्धा गमवावा लागू शकतो. बऱ्याचदा ब्लड प्रेशर मोजताना आपण एक मोठी चूक करतो. तज्ज्ञांच्या मते, चुकीच्या पद्धतीने ब्लड प्रेशर मोजल्यामुळे बरेच रुग्ण घाबरून थेट आपत्कालीन विभागाकडे (ER) धाव घेतात. त्यांच्या मते, फक्त एक छोटी चूकही रीडिंग चुकीची दाखवू शकते आणि त्यामुळे तुमच्या मनातली भीती वाढू शकते.

BP तपासण्याची योग्य पद्धत

तज्ज्ञांच्या मते, ब्लड प्रेशर (BP) मोजताना नकळत होणारी चूक म्हणजे, पाय क्रॉस करून बसणं, त्यावेळेस खूप बोलणं किंवा फोन वापरणं, चुकीच्या आकाराचा कफ वापरणं किंवा BP तपासण्याआधी एका जागी स्थिर न बसणं या सवयींमुळे रीडिंग जास्त येऊ शकते. अशा चुकीच्या रीडिंगमुळे रुग्णाला हाय ब्लड प्रेशरची समस्या वाटते आणि त्यामुळे मानसिक ताण वाढतो.

त्यामुळे रक्तदाब मोजताना पाठीला आधार देऊन खुर्चीत नीट बसा, पाय जमिनीवर सपाट ठेवा आणि मोजण्याच्या किमान पाच मिनिटं आधी शांत बसा. हात हार्टच्या लेव्हलवर टेबलावर स्थिर ठेवा आणि BP तपासताना पूर्ण शांतता ठेवा. योग्य आकाराचा कफ वापरणंही तितकंच महत्त्वाचे आहे.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कांद्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक,दोन्ही उपमुख्यमंत्री असणार उपस्थित

Shocking : भयंकर! बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरने साधली संधी; धाकट्या बहिणीवर अत्याचार करून काढला पळ

Famous Actress : "मेरे करण, अर्जुन आ गए..."; ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, जुळ्या मुलांना दिला जन्म

Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीसोबत काँग्रेस करणार युती? बड्या नेत्याच्या ट्विटनं राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai Goa Highway : "...मग टोल घ्या" मुंबई-गोवा महामार्गावर कोकणवासीयांचा जनआक्रोश

SCROLL FOR NEXT