Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्यांचे सल्ले आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. अजुनही लोक त्यांची चाणक्य निती मोठ्या प्रमाणात वाचतात.
चाणक्य नितीही अनेकांना त्यांच्या अपयशाच्या काळात कसं राहीलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे? याबद्दल मार्गदर्शन मिळतं.
काही सवयी माणसाच्या प्रगतीला अडथळे आणू शकतात. वेळीच सुधारणा केली नाही तर त्या आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं.
माणसाचा आळस हा मोठा शत्रू आहे. त्यामुळे त्याचं वर्तमान आणि भविष्य दोन्ही धोक्यात येतं.
नेहमी उद्या करू... असं म्हणणारे लोक यशस्वी होत नाहीत. सातत्याने मेहनत करणारेच पुढे जातात.
रागात घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे नातेसंबंध आणि मेहनत दोन्ही एका क्षणात नष्ट होऊ शकतात.
रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी संयम आवश्यक आहे. शांत स्वभाव यशाच्या दिशेने नेतो.