Sprouts For Weight Loss Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss: वाढत्या वजनाने त्रस्त आहात? सकाळच्या नाश्त्यात कडधान्यांचा समावेश करा

Sprouts For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी कडधान्ये खूप फायदेशीर असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Weight Loss Tips :

अनेकांना वजनवाढीच्या समस्या असतात. त्यामुळे खूप आजारांना सामोरे जावे लागते. वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात बदल करणे आवश्यक असते. त्यासाठी आहारात पौष्टिक आणि कमी कॅलरीज असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा.

वजन कमी करण्यासाठी कडधान्ये खूप फायदेशीर असतात. कडधान्यांमध्ये जास्त प्रमाणात विटामिनचा समावेश असतो. त्यामुळे आरोग्यास पोषक तत्वे मिळतात. जर तुम्ही रोज कडधान्य खाल्ले तर तुम्हाला शरीरात जास्त प्रमाणात मल्टीविटामिनचा समावेश होईल. कडधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

मोड आलेल्या कडधान्यात जास्त प्रमाणात तत्वे असतात. तसेच ते पचनासाठीही खूप हलके असते. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन आणि पोटॅशियम असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच यात एन्झाइमची मात्रा सर्वात जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया चांगली होते. त्यामुळे ज्या लोकांना अॅसिडिटी किंवा पचनाच्या समस्या असतील त्यांनी कडधान्ये खायला हवेत.

कडधान्य आरोग्यासाठी प्री बायोटिक म्हणून काम करतात. त्यामुळे आतड्यांना फायदा होतो. तसेच प्रतिकारशक्ती देखील वाढते. कडधान्ये नेहमी ताजी असावीत याची काळजी घ्यावी.

मिक्स कडधान्ये त्यात तुम्ही चाट मसाला टाकून चविष्ट आणि चटपटीत बनवू शकतात. त्यामुळे खायला चविष्ट आणि पौष्टिक अशी असे दोन्ही फायदे होतील. तसेच तुम्ही भिजवलेली कडधान्ये खाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT