Fitness Tips : घरबसल्या मिळवा जिमसारखा फिटनेस; फक्त ५ मिनिटांचा Workout

Saam Tv

व्यायामाचे फायदे

व्यायामामुळे शरीर ताजेतवाने राहते. व्यायाम केल्याने आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहते. पण बऱ्याच जणांना जिमला जायला वेळच मिळत नाही.

FITNESS TIPS | PINTREST

घरीच जिमसारखा व्यायाम

तुम्ही जिमसारखा व्यायाम घरीच करू शकता हे तुम्हाला माहित आहे का? अगदी कमी वेळात तुम्ही घरीच व्यायाम करून स्वत:ला फिट ठेवू शकता.

FITNESS TIPS | PINTREST

चरबी कमी होण्यास मदत

केवळ काही वेळात हे पाच व्यायाम जर तुम्ही केलेत तर पोटाच्या, मांडीच्या आणि नितंबावरील चरबी कमी होण्यास मदत होईल .

FITNESS TIPS | PINTREST

टक इन क्रंच

पाठीवर झोपून हात डोक्याच्या वर न्यावे. गुडघे वाकवून पाय वर उचलावेत. हात खाली करून डोक उचलून वर उठाव, गुडघे छातीच्या जवळ घेऊन पाठ जमिनीवर टेकवावी. हात वर डोक्याच्या दिशेने न्यावेत. गुडघे दुमडलेले ठेवून जमिनीला टाचा टेकवाव्यात.

FITNESS TIPS | PINTREST

सिंगल स्ट्रेट लेग स्ट्रेच

पाठीवर झोपून डोक्यापासून खांद्यापर्यंतचा भाग अंधातरी ठेवावा. कंबर जमिनीवरच ठेवावी. पाय थोडे हवेत उचलावेत. पाय ९० अंशात असावे. डावा पाय वर नेत सरळ करावा. पाय वर करताना हाताने पकडावा. तो पाय सोडून उजवा पाय वर न्यावा.यावेळी डावा पाय ९० अंशातच ठेवावा.

FITNESS TIPS | PINTREST

प्लँक टिक टॉक

पालथ झोपून हातांवर जोर देत उठाव. पहिला डावा पाय बाजूला करावा. जवळ आणावा. मग उजवा पायासोबतही तसेच करावे. हा व्यायाम करताना नितंबावर भार येणार नाही याची काळजी घ्यावी.

FITNESS TIPS | PINTREST

सिंगल लेग वी अप

पाठीवर झोपून हात डोक्याच्या वर सरळ ठेवावेत. खांदे उचलून एक हात पायाच्या खाली न्यावा. पायाची स्थिती व्ही आकारासारखी झाली असेल,मग पाठ जमिनीला ठेकवावी. दुसऱ्या पायासोबतही असाच प्रकार करावा.

FITNESS TIPS | PINTREST

सीटेड क्रॉस बॉडी ट्विस्ट

सरळ पाय मोकळे करून बसा. हात डोक्याच्या मागे धरा. गुडघे वाकवून एक पाय छातीपर्यंत आणा. शरीराचा वरचा भाग विरूद्ध दिशेने फिरवून क्रॉस पोझिशन करा. दोन्ही बाजूंना हा व्यायाम करावा.

FITNESS TIPS | PINTREST

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच

आठवड्यातून सकाळी हे व्यायाम करावे. न थांबता व्यायाम केल्याने काही दिवसातच तुम्हाल फरक जाणवेल. व्याायामासोबतच आरामची देखील तितकाच महत्त्वाचा असतो. जर तुम्हाला काही आजार असेल तर हे व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.

FITNESS TIPS | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

FITNESS TIPS | PINTREST

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

DARK CIRCLE REMEDIES | CHATGPT
येथे क्लिक करा