Roti History: भारताची रोटी झाली ग्लोबल! आरोग्यासोबतच जपतेय अनेक पिढ्यांचा वारसा

Kitchen Tips : भारतात प्रामुख्याने गव्हाची रोटी बनवली जाते.
Roti Benefits
Roti BenefitsSaam Tv
Published On

Roti Benefits:

वरण, भात , भाजी आणि रोटी हा भारतीयांसाठी परिपूर्ण आहार आहे. या जेवणात जर रोटीचा समावेश नसेल तर जेवण पूर्ण होत नाही. रोटी हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. जगभरात लाखो लोक रोटी खातात. फक्त चपाती नव्हे तर त्यापासून अनेक पदार्थदेखील बनवले जातात.

भारतात प्रामुख्याने गव्हाची रोटी बनवली जाते. गव्हाच्या पीठापासून रोटी बनवली जाते. इतर देशात रोटी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. एकप्रकारे रोटी हा चांगला आहार आहे.

Roti Benefits
Government Scheme: शेतकऱ्यांसाठी सरकारच्या जबरदस्त योजना, खात्यात येतील अधिक पैसे

आजकाल रोटी बनवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. रोटी बनवण्यासाठी जगभरात रोटी मेकर उपलब्ध आहे. लाखो रुपयांचे रोटी मेकर 90 सेकंदात गोल रोटी बनवते. तसेच रोटीसाठी अमेरिकेत किराना दुकानात फ्रोझन प्रकारामध्ये रोटी उपलब्ध असते.

भारतात वेगवेगळ्या शहरात रोटीला अनेक नावे आहेत. गुजरातीत त्याला रोटली, महाराष्ट्रात चपाती, मध्य प्रदेशात रोटी या नावाने ओळखले जाते. चपातीला आपण अनेक पदार्थांसोबत खाऊ शकतो. गुळ, तूप, चटणी, भाजीसोबत रोटी खाल्ली जाते. भारतीयांसाठी रोटी ही ना फक्त पदार्थ तर एक भावना आहे. असं फूड इन्फ्लुएनसर पलक पटेलने सांगितले आहे.

एका संशोधनानुसार, रोटी या शब्दाची संकल्पना सर्वात आधी सिंधु आणि गंगाच्या क्षेत्रात झाली होती. त्यामुळे रोटीचा जन्म भारतात झाल्याचे म्हटले आहे. सुरवातीला तेल किंवा लोणीसोबत गव्हाचे पीठ मळले जायचे. जेणेकरुन रोटी फार वेळ मऊ राहिल. त्यानंतर बदल होत आता बाजारात रेडीमेड रिफाइंड पीठ मिळते. हे पीठ स्वस्त आणि जास्त काळ टिकणारे आहे. रोटीला आता वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात. पिझ्झा किंवा फ्रेंच टोस्टसाठीदेखील रोटीचा बेस वापरला जातो. त्यामुळे रोटी आता ग्लोबल झाली असे म्हणायला हरकत नाही.

Roti Benefits
Oppo Find N3 Flip : ओप्पोचा नवा स्टायलिश फोन लॉन्च; घडी करुन खिशात ठेवता येणार, फीचर्सही भन्नाट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com