सरकार नेहमीच नागरिकांच्या भल्यासाठी अनेक योजना राबवत असते. त्यात काही योजना शेतकऱ्यांसाठी असतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी या योजना राबवल्या जातात.
भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने काही महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक आणि शेतीशी संबंधित अवजारे, कामे, पीक विमा यासाठी मदत मिळते. सरकारच्या याच काही योजनांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
पीएम किसान सन्मान निधी योजना
पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना 3 हप्त्यात दिले जातात. प्रत्येकी २ हजारांच्या हप्त्यात ही रक्कम दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज भरावा लागतो. या अर्जाच्या अधिक माहितीसाठी शेतकरी किसान योजना हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क करु शकतात.
पीएम किसान मानधन योजना
पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दर महिन्याला 3000 रुपये मिळतात. या योजनेत १८ ते ४० वयोगटातील शेतकरी अर्ज करु शकतात. वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी दर महिन्याला काही रक्कम गुंतवावी लागेल. 18 व्या वर्षी ५५ रुपये तर ४० व्या वर्षी गुंतवणूक केल्यास २०० रुपये गुंतवणूक करावी लागेल.
पंतप्रधान पीक विमा योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण दिले जाते. पीकाला किड, रोगाची लागण झाल्यास या योजनेतून तुम्हाला आर्थिक साहाय्य मिळू शकते. यासाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागणार आहे. यावर सरकार सबसिडी देते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.