World Egg Day 2023 : अंडं हे शरीरात प्रोटीन्स वाढीसाठी उपयुक्त, रोज खाल्ल्याने मिळतील हे 5 फायदे

Egg Benefits : हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना अंड्यांमध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल जागरूक करणे हा आहे.
World Egg Day 2023
World Egg Day 2023Saam Tv
Published On

World Egg Day :

जागतिक अंडी दिन 13 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना अंड्यांमध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल जागरूक करणे हा आहे. अंड्याला प्रोटीन्सचे पॉवरहाऊस म्हणतात. यामध्ये 13 विविध प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि अँटी ऑक्सिडंट आढळतात.

बहुतेक लोकांना नाश्त्यात अंडी खायला आवडतात. अभ्यासानुसार, अंडी खाल्ल्याने दीर्घकाळ भूक लागत नाही. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच ते रक्तातील साखर (Sugar) आणि इन्सुलिनचे प्रमाणही नियंत्रणात ठेवते. चला जाणून घेऊया रोज अंडी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात.

पौष्टिकतेची कमतरता पूर्ण करते मोठ्या अंड्यामध्ये सुमारे 77 कॅलरीज असतात आणि त्यात जीवनसत्त्वे A, B5, B12, B6, D, E, K आणि फोलेट, फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, जस्त आणि प्रथिने सारखी खनिजे असतात आणि हृदय निरोगी (Healthy) असतात. यामुळे शरीरात निरोगी चरबी आढळते.

अंड्यांमध्ये कोलीन असते -

कोलीन हे एक महत्वाचे पोषक तत्व आहे जे बहुतेक लोकांना मिळत नाही. कोलीन शरीरातील पेशी आणि मेंदूचे रेणू तयार करण्याचे काम करते. शरीरात कोलीनच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्या (Problem) उद्भवतात. एका उकडलेल्या अंड्यांमध्ये सुमारे 417 मिलीग्राम कोलीन आढळते.

World Egg Day 2023
Egg Benefits For Hair : केसातील कोंड्यापासून त्रस्त आहात? सतत केस कडक होतात, हा हेअर मास्क ठरेल फायदेशीर

दृष्टी सुधारते -

अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सन्थिन अँटी ऑक्सिडंट असतात. यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो आणि दृष्टी सुधारते. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी आवश्यक मानले जाते.

प्रथिने आणि अमीनो ऍसिडचे योग्य प्रमाण -

एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन असते जे वजन कमी करण्यासाठी, स्नायूंची घनता वाढवण्यासाठी, रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी प्रभावी आहे. अंड्यांमध्ये अमिनो अ‍ॅसिडही योग्य प्रमाणात आढळते. यामुळे शरीर प्रथिनांचा पुरेपूर वापर करू शकते.

World Egg Day 2023
Egg Benefits: गावठी अंडी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?

ओमेगा-3-

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. हे हृदय, मेंदू आणि डोळ्यांसाठी खूप चांगले मानले जाते. अंड्यांमध्ये भरपूर कोलेस्टेरॉल आढळते पण त्याचा रक्तातील कोलेस्टेरॉलवर परिणाम होत नाही. हे वेगवेगळ्या लोकांवर देखील अवलंबून असते. अंडी खाणाऱ्या 70 टक्के लोकांमध्ये कोलेस्टेरॉलची तक्रार नसते, तर 30 टक्के लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलमध्ये किंचित वाढ होते.

World Egg Day 2023
Egg Hair Mask : कोरड्या-रुक्ष केसांपासून सुटका हवीये? अंड्यापासून बनवा हेअर मास्क, केस होतील सॉफ्ट अन् शाइन

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त -

वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी खाण्याची इच्छा असेल तर अंड्यांपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. अंड्यांमध्ये खूप कमी कॅलरी आणि भरपूर प्रथिने असतात. अंडी खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com