Egg Hair Mask : कोरड्या-रुक्ष केसांपासून सुटका हवीये? अंड्यापासून बनवा हेअर मास्क, केस होतील सॉफ्ट अन् शाइन

White Hair Problem : तरुणाईमध्ये केसगळती, अकाली केस पिकणे, केसांची योग्यरित्या वाढ न होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
Egg Hair Mask
Egg Hair MaskSaam Tv

Hair Falls Problem :

वाढत्या प्रदूषणाचा आपल्या केसांवर परिणाम होतो. खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. तरुणाईमध्ये केसगळती, अकाली केस पिकणे, केसांची योग्यरित्या वाढ न होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

केसांची निगा राखण्यासाठी आपण केसांना पोषण मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी अंडी फायदेशीर ठरतील. अंडी ही जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहेत, ज्याचा वापर करून स्कॅल्प संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो. घरच्या घरी अंड्याचा केसांचा मास्क कसा बनवायचा ते सांगणार आहोत.

Egg Hair Mask
Tulsi Leaves For Hair : सतत गळणाऱ्या केसांची होईल सुट्टी! कोंड्याला करा कायमचे बाय बाय; अंगणातली तुळस ठरेल फायदेशीर

1. बदामाचे दूध, नारळाचे तेल आणि अंड्याचा मास्क

बदामाचे (Almond) दूध, नारळाचे तेल आणि अंड्याचा मास्क यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात, ज्यामुळे केस निरोगी राहण्यास मदत होते. हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात तीन-चार चमचे बदामाचे दूध घ्या, त्यात १ चमचा खोबरेल तेल आणि अंड्याचा पांढरा भाग घाला. हे मिश्रण चांगले फेटून घ्या. हा हेअर (Hair) मास्क केसांना लावा आणि अर्ध्या तासांने केस धुवा.

Egg Hair Mask
Shirdi Trip In Budget : बजेटमध्ये फिरा शिर्डी; वन डे ट्रिप कशी कराल? जाणून घ्या सविस्तर

2. ऑलिव्ह ऑइल आणि अंड्यातील पिवळ बलक

व्हिटॅमिन (Vitamin) -ए, व्हिटॅमिन-डी, व्हिटॅमिन-ई, प्रथिने, फॅटी अॅसिड्स यांसारखे सर्व पोषक घटक अंड्याच्या पिवळ्या बलकात आढळतात. जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. या मास्कचा वापर करून केस गळतीवर नियंत्रण ठेवता येते. ज्यामुळे तुमचे केस मजबूत होतील. एका भांड्यात 2 अंड्यातील पिवळ बलक घ्या. 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल घ्या आणि 1 कप पाणी घाला. हे मिश्रण टाळूवर लावा, कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा.

3. अंडी आणि कोरफड

अंडी आणि कोरफडी तुमच्या केसांसाठी अतिशय प्रभावी उपाय आहे. या मास्कचा वापर करून तुम्ही निरोगी केस मिळवू शकता. हा मास्क बनवण्यासाठी एका लहान भांड्यात 2-3 चमचे अंड्यातील पिवळ बलक घ्या, त्यात 3-4 चमचे कोरफड जेल घाला. हे मिश्रण चांगले फेटून घ्या. आपण एक चमचा ऑलिव्ह तेल देखील मिक्स करू शकता. हा हेअर मास्क केसांवर लावा, ३० मिनिटांनी पाण्याने धुवा.

Egg Hair Mask
Bhiwandi One Day Trip: ठाणे जिल्ह्यातील भिंवडीतही आहेत फिरण्याची ठिकाणे; वन डे ट्रिप होईल अविस्मरणीय

4. दही, लिंबाचा रस आणि अंडी मास्क

केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर हा हेअर मास्क तुम्हाला मदत करेल. याच्या वापराने कोंड्याची समस्याही दूर होईल. एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या, त्यात ३-४ चमचे दही आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण चांगले फेटून घ्या. हा मास्क केसांना लावा, सुमारे 1 तासानंतर पाण्याने किंवा शॅम्पूने धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com