प्रत्येक व्यक्तीला फिट राहायला प्रचंड आवडतं. पण जीभेला जास्त चव असल्याने मस्त चमचमीत पदार्थ ते खातात. मग त्यामध्ये असणारे फॅट, तेल याकडे कानाडोळा केला जातो. याचा परिणाम तुमचं शरीर लगेचच दाखवतं. पुढे पोटाच्या वाढत्या घेराचं टेन्शन येतं आणि लोक जिमला जाण पसंत करतात. तिथे व्यायामासोबतच तुमच्या डाएटमध्ये सुद्धा बदल करायला सांगितला जातो. आणि त्याचसोबत वजन कमी करण्यासाठी प्रोटीन (Protein) खा असा सल्ला दिला जातो.
जे तुमच्या शरीराची हानी करतं. पण आता तुम्हाला पैसे खर्च नकरता काही गोष्टींकडे लक्ष देऊन व्यवस्थित व्यायाम करुन ३ महिन्यात तब्बल १० किलो वजन कमी करता येऊ शकतं. कसं ते जाणून घेण्यासाठी पुढील संपूर्ण बातमी वाचा.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ट्रेनर विमल राजपूत यांनी प्रोटीनचे वेड न लावता फक्त दैनंदिन सवयी बदलून अवघ्या ३ महिन्यांत सुमारे १० किलो वजन कमी केलं. सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या अनुभवातून अनेकांसाठी महत्वाचं मार्गदर्शन मिळालं आहे. विमल यांनी स्पष्ट केलं की परिपूर्ण डाएट किंवा कडक नियमांपेक्षा सातत्य आणि शिस्त जास्त महत्त्वाची आहे. त्यांनी वजन कमी करताना खालील ५ गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित केलं.
दररोज परफेक्ट डाएट फॉलो करण्याऐवजी नियमित चांगलाच आहार खाणं, व्यायाम करणं, त्या सातत्य ठेवणं, संयम राखणं या गोष्टींवर भर दिला. लवकर वजन कमी करण्याच्या नादात पडून चुकीचा निर्णय घेतला नाही.
दिवसातून तीन वेळा जेवण केले पाहिजे, रात्री उशिरा खाण टाळलं पाहिजे आणि संध्याकाळी ७ ते सकाळी ७ असा १२ तासांचा उपवास त्यांनी केला. यामुळे शरीराला शिस्त लागली आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत झाली.
फक्त जास्त पाणी पिण्याऐवजी योग्य पद्धतीने पाणी पिणं योग्य ठरतं. दररोज २ ते ३ लिटर पाणी, जेवणापूर्वी एक ग्लास पाणी आणि आवश्यकतेनुसार इलेक्ट्रोलाइट्सचा वापर केला.
वय वाढल्यानंतर वजन कमी करण्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दररोज ७ ते ८ तास झोप, झोपण्यापूर्वी मोबाईल-स्क्रीन टाळा आणि झोपेची वेळ तिच ठेवण्यावर त्यांनी भर दिला.
दररोज किमान ३० मिनिटं चालणे, ८ ते १० हजार पावले पूर्ण करा आणि योग्य पद्धतीने वजन करण्यावर भर द्या. तसेच तणाव कमी ठेवण्यावरही लक्ष दिलं पाहिजे, कारण जास्त ताणामुळे वजन कमी होत नाही. शेवटी त्यांनी टिप दिली की उपाशी राहणे किंवा शरीरावर जास्त ताण देणे योग्य नाही. हळूहळू जीवनशैलीत बदल केल्याने शरीरात सकारात्मक बदल नक्कीच दिसून येतात.
टीप: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. कोणताही डाएट किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.