Sakshi Sunil Jadhav
लाल साडी महिलांवर सुंदर आणि रेखीव दिसते. पण लग्न समारंभ, सण-उत्सव किंवा खास कार्यक्रमातच या साड्या नेसल्या जातात. मग त्या नकोशा वाटतात.
तुम्हाला तीच साडी वारंवार नेसायचा लूक एकसारखा वाटू लागतो. अशावेळी कॉन्ट्रास्ट ब्लाउज डिझाइन तुमचा संपूर्ण लूक उठावदार आणि स्टायलिश बनवू शकतो. जाणून घ्या लाल साडीवर कोणते ब्लाउज कॉम्बिनेशन ट्राय करू शकतो.
लाल-हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन खूपच पारंपरिक आणि सुंदर दिसतं. लग्न किंवा सणासाठी वर्क असलेला हिरवा ब्लाउज बेस्ट पर्याय ठरतो.
जरी, एम्ब्रॉइडरी किंवा हलकं स्टोन वर्क असलेले हिरवे ब्लाउज लाल साडीवर जास्त उठून दिसतात.
कार्यक्रमासाठी लाल साडीवर पांढरा प्रिंटेड कॉटन ब्लाउज घातल्याने फ्रेश आणि एलिगंट लूक मिळतो.
लाल साडीसोबत पिवळ्या रंगाचा ब्लाउज खूपच सुंदर दिसतो. हलकी एम्ब्रॉइडरी असलेला ब्लाउज खास प्रसंगी एलिगंट लूक देतो.
फुल एम्ब्रॉइडरी, जरी किंवा स्टोन वर्क असलेले हेवी ब्लाउज लाल साडीला रॉयल टच देतात.
लग्न रिसेप्शन, पार्टी किंवा नाईट फंक्शनसाठी लाल साडी आणि हेवी वर्क ब्लाउज हा उत्तम पर्याय आहे.
तुम्ही एकच लाल साडी वेगवेगळ्या ब्लाउज डिझाइनसोबत नेसू शकता. याने प्रत्येक वेळी नवीन आणि स्टायलिश लूक मिळतो.