Watermelon Benefits, Constipation Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Watermelon Benefits : उन्हाळ्यात फायदेशीर ठरेल कलिंगड, वजन होईल कमी; पचनक्रियाही सुधारेल

Constipation Problem : हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला वाढत्या वजनाचा त्रास सहन करावा लागतो. डेस्क जॉबमुळे वाढत्या वजनासोबतच आपण बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

कोमल दामुद्रे

Watermelon For Weight Loss :

हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला वाढत्या वजनाचा त्रास सहन करावा लागतो. डेस्क जॉबमुळे वाढत्या वजनासोबतच आपण बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, लठ्ठपणांचा वाढता आजार हा प्रौढांसह किशोरवयीन मुलांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. लठ्ठपणापासून स्वत:ला वाचवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. हेल्दी डाएटपासून (Diet) ते वर्कआउटपर्यंत लोक अनेक प्रकारे वजन कमी (Weight Loss Tips) करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हालाही सतत वाढते वजन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येचा त्रास सहन करावा लागत असेल तर कलिंगडचे (Watermelon) सेवन करा.

कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात. कलिगंडमध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. याचे सेवन केल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सी चे मुबलक प्रमाणात सेवन करायला हवे. आरोग्याला कसा फायदा होतो जाणून घेऊया.

1. जास्त प्रमाणात पाणी

कलिगंडमध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. जे तुम्हाला दीर्घकाळ हायड्रेट ठेवते. यामुळे तुमचे पोट भरलेले राहते.

2. लाइकोपीनचा चांगला स्त्रोत

लाइकोपीन हे शक्तीशाली अँटिऑक्सिडेंट आहे. जे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते.

3. कमी कॅलरी

कमी कॅलरी असल्यामुळे कलिंगड हे आरोग्यासाठी चांगला पर्याय आहे. यामध्ये साखरेचे प्रमाणही नैसर्गिक असते. ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी कलिंगड उत्तम पर्याय आहे.

4. फायबर

कलिंगडमध्ये अधिक फायबर असते ज्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. याचे सेवन केल्याने पचन सुधारते तसेच आतड्यांसंबंधी हालचालींचे नियमन करुन वजन कमी करण्यास मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT