Heart attack symptoms saam tv
लाईफस्टाईल

Heart attack symptoms: हार्ट अटॅक येण्यापूर्वी रात्री उशीरा शरीर देतं ही संकेत; पाहा काय आहेत लक्षणं

Early symptoms of heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर काही संकेत देतं. छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, थकवा, मळमळ आणि थंड घाम येणं ही महत्त्वाची लक्षणं आहेत. ही लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सध्याच्या घडीला हेल्दी लाईफस्टाईल जोपासणं गरजेचं आहे. चुकीचा आहार आणि बिघडलेली लाईफस्टाईल यामुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. यापैकीच एक समस्या म्हणजे हार्ट अटॅक... सततचा ताण, अपुरी झोप, खराब आहार आणि मानसिक आरोग्याच्या समस्या यामुळे हा धोका वाढतोय. या सगळ्यात सर्वात मोठा धोका म्हणजे उच्च रक्तदाब.

हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर काही संकेत देत असतं. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहितीये का हार्ट अटॅक येण्यापूर्वी रात्री उशीरा शरीरात काही संकेत दिसून येतात. ही लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.

छातीत अस्वस्थता

छातीत दुखणं किंवा जडपणा जाणवणं हे हार्ट अटॅकचं एक प्रमुख लक्षण मानलं जातं. छातीवर दाब येणं, चिरडल्यासारखं वाटणं किंवा सतत दुखणं अशी भावना निर्माण झाली तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

श्वास घेण्यास त्रास

काही लोकांना अचानक श्वास घ्यायला त्रास होतो. कोणतंही मेहनतीचं काम न करता हा त्रास होत असेल तर तुम्ही दुर्लक्ष करू नये. श्वासोच्छवासाचा त्रास हा हार्ट अटॅकचं संकेत असू शकतो. त्यामुळे हा त्रास वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

मळमळ आणि चक्कर येणं

हार्ट अटॅकच्या सुरुवातीला मळमळ, चक्कर येणं किंवा अचानक बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसू शकतात. याचा अर्थ तुमच्या शरीरात काही ना काही बिघाड झाला असू शकतो. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

असामान्य थकवा

अचानक खूप थकवा जाणवणं किंवा नेहमीपेक्षा जास्त अशक्त वाटणं, विशेषतः गेल्या काही दिवसांत हा त्रास सुरू झाला असेल तर हे लक्षण गंभीर असू शकतं. सततचा थकवा असेल तर तो हलक्यात घेऊ नये आणि वेळेवर डॉक्टरांकडे जावं.

थंड घाम येणं

कधी कधी कोणतंही कारण नसताना थंड घाम येऊ लागतो. हा प्रकार वारंवार होत असेल, तर तो हृदयाच्या समस्येचा इशारा असू शकतो. अशा वेळी तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Bichukale: झोळी रिकामीच! बारामती पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकलेंना नोटांपेक्षा कमी मते

Baramati rahuri bypolls election results: पाचपैकी तीन राज्यात विजय झाल्यानंतर धुळ्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Election Result Live : नंदीग्राम मतदारसंघातून सुवेदु अधिकारी यांची आघाडी

आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षाचा दारुण पराभव

Election Result: कमळ यात्रा, फुटबॉल मॅच अन् बैठकांचं सत्र; जाणून घ्या भाजपच्या बंगाल विजयाची इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT