MindAfter Midnight saam tv
लाईफस्टाईल

Stress Control: सावधान! मध्यरा‍त्रीपर्यंत झोप येत नाही, दररोज जागरण होतेय? तर हा गंभीर आजाराचा धोका

MindAfter Midnight: मध्यरात्रीनंतर जागरण करणं मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि भावनांवर नकारात्मक परिणाम करु शकतं. झोपेचा अभाव ताण, नैराश्य आणि चिडचिड वाढवतो, त्यामुळे झोपेचं आरोग्य जपा.

Sakshi Sunil Jadhav

मध्यरात्रीनंतर जागरण केल्याने मेंदूची कार्यक्षमता आणि भावनिक स्थैर्य कमी होते.

सर्केडियन रिदम बिघडल्याने ताण आणि चिडचिड वाढते.

कमी झोपेमुळे स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतो.

नियमित झोपेच्या सवयींनी मेंदू आणि मनाला विश्रांती मिळते.

आजच्या २४ तासांच्या डिजिटल जगात, रात्री उशिरापर्यंत जागरण करणं आता अनेकांसाठी सोपं झालं आहे. ऑफिसचं काम पूर्ण करणं, सोशल मीडियावर स्क्रोल करणं किंवा सिरीज बघण्यात वेळ घालवणं हे सगळं आता नॉर्मल मानलं जातं. मात्र निसर्गाने बनवलेला आपल्या शरीराचा आणि मेंदूचा घड्याळाचा रिदम तसा नाही. वैज्ञानिक संशोधनानुसार, मध्यरात्रीनंतर जागरण करणं आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि भावनिक स्थैर्यावर गंभीर परिणाम करू शकतं. पुढे जागरणामुळे आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Mind After Midnight प्रभाव म्हणजे नेमकं काय?

Frontiers in Network Physiology या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, मध्यरात्रीनंतर मेंदूची संज्ञानात्मक क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होते. या काळात शरीरातील जैविक घड्याळ अर्थात circadian rhythm विस्कळीत होतो. त्यामुळे व्यक्ती जास्त उतावळी, अस्थिर आणि चिडचिडी बनते.

रात्री जागरणाने मेंदूवर काय परिणाम होतो?

रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने न्यूरॉन्सची कार्यक्षमता कमी होते आणि सेरोटोनिन व डोपामाइनसारख्या न्यूरोट्रान्समीटरच्या संतुलनात बदल होतो. यामुळे व्यक्तीचा मूड पटकन बदलतो. तसेच लक्ष केंद्रित ठेवणं कठीण जातं आणि निर्णय घेताना चुका होतात. संशोधनात असंही आढळलं आहे की, रात्री उशिरा जागणाऱ्या लोकांमध्ये नकारात्मक भावना आणि ताण अधिक प्रमाणात दिसून येतो.

कमी झोपेमुळे मानसिक आणि भावनिक परिणाम

कमी झोपेमुळे फक्त थकवा नाही तर मानसिक अस्थिरता निर्माण होते. रात्री उशिरा नकारात्मक भावनांचा टप्पा वाढतो. त्यामुळे नैराश्य, चिंता आणि चिडचिड निर्माण होऊ शकते.

जास्त वेळ उशिरापर्यंत जागरणाचे धोके

जास्त वेळ उशिरापर्यंत जागणं आणि झोपेचा विस्कळीत पॅटर्न हे मेंदूच्या वृद्धिंगत प्रक्रियेला गती देतात. अशा लोकांमध्ये cognitive decline (स्मरणशक्ती कमी होणे) आणि dementiaचा धोका वाढतो. मेंदूतील white matter मध्ये बदल होऊन Alzheimer सारख्या आजारांचा धोका वाढतो.

टीप

ही माहिती केवळ सामान्य जागरूकतेसाठी आहे. कोणत्याही आरोग्य समस्येबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

मध्यरात्रीनंतर जागरण केल्याने काय होते?

रात्री उशिरापर्यंत जागल्याने मेंदूची कार्यक्षमता कमी होते आणि चिडचिड वाढते.

'Mind After Midnight' प्रभाव म्हणजे काय?

निर्णय घेण्याची क्षमता आणि भावनिक स्थैर्य कमी होणे.

दीर्घकाळ जागरणाचे दीर्घकालीन धोके कोणते?

स्मरणशक्ती कमी होणे, cognitive decline आणि Alzheimer सारख्या आजारांचा धोका वाढतो.

मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी काय करावे?

नियमित झोपेची वेळ ठेवा, स्क्रीनपासून दूर राहा, ध्यान आणि वाचन करा, कॅफीन टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरी परतताना शिक्षकावर हल्ला, २ हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घातली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: स्मृती मानधनाच्या विवाहस्थळी रुग्णवाहिका दाखल, एकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं

Kriti Sanon: तेरे इश्क में हर रंग लाल...; क्रिती सॅननचा रॉयल लूक व्हायरल, पाहा PHOTO

Global Realty Expo : महाराष्ट्राची माती अबुधाबीत चमकली, सकाळच्या ग्लोबल रिअल्टी एक्स्पोने इतिहास रचला

Accident News : संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ब्रिजवर अचानक ब्रेक मारला, ३-४ वाहने धडकली, ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT