

सेविंग अकाउंट बहुतेक लोक पैसे ट्रान्सफर, डिपॉझिट, कॅश विथड्रॉल आणि पेमेंटसाठी वापरतात. रोजच्या व्यवहारांमध्ये अनेक जण हे लक्षात ठेवत नाहीत की काही व्यवहार Income Tax विभागाच्या तपासणीस पात्र ठरू शकतात. चार्टर्ड अकाऊंटंट अभिषेक सोनी, CEO व सह-संस्थापक, Tax2win आणि तरुण कुमार मादान यांनी सांगितले की, काही ठराविक व्यवहार विभागाच्या लक्षात येऊ शकतात. तसेच सेविंग अकाउंटवर कोणते व्यवहार तुमच्या अडचणी वाढवणार याबद्दलही माहिती देण्यात आली आहे. जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार काही ठराविक व्यवहार हे विभागाच्या लक्षात येऊ शकतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या Financial वर्षात सर्व खात्यांमधून एकूण १० लाखांहून अधिक रोख रक्कम जमा केली तर बँकेला ती आयकर विभागाला रिपोर्ट करावी लागते. हे गैरकायदेशीर नाहीत.
मात्र रक्कमेचा स्रोत सांगण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जसे की खरेदी-विक्रीचे दस्तऐवज किंवा भेटवस्तू पत्रे ठेवा. क्रेडिट कार्ड बिले, मोठ्या किंवा वारंवार कॅश विथड्रॉल्स, मोठ्या मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार, अचानक निष्क्रिय खात्यांमध्ये मोठ्या रकमांचे व्यवहार, विदेशी चलन व्यवहार, व्याज-उत्पन्नाचा विसंगती, डिव्हिडेंड व कॅपिटल गेन, अनेक खात्यांमधील व्याज नोंदीचा अपुरेपणा, तसेच एखाद्याच्या क्रेडिट/डेबिट कार्डवरून मोठ्या किमतीचे पेमेंट्स हे सर्व व्यवहार आयकर विभागाच्या नजरेत येऊ शकतात.
विशेष म्हणजे, बँक आणि आर्थिक संस्थांकडून केले जाणारे रिपोर्टिंग ऑटोमेटेड असतं आणि Income Tax Department हे आपोआप तपासतो की जाहीर केलेल्या उत्पन्नाशी व्यवहार जुळतात की नाहीत. यामुळे, कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे, योग्य रेकॉर्ड ठेवणे आणि आवश्यकतेनुसार दस्तऐवज तयार ठेवणे महत्त्वाचे आहे.
तज्ज्ञांचा सल्ला आहे की रोख व्यवहार, मोठे पेमेंट्स किंवा उत्पन्नाशी सुसंगत नसलेले व्यवहार करण्यापूर्वी सतर्क राहावं आणि आपल्या सर्व खात्यांचे व्याज, डिव्हिडेंड आणि इतर उत्पन्न वेळेवर आयटीआरमध्ये दाखल करावे. या सोप्या नियमांचे पालन केल्यास अनपेक्षित नोटिसेस टाळता येऊ शकतात आणि आर्थिक व्यवहार सुरळीत राहतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.