High cholesterol saam tv
लाईफस्टाईल

High cholesterol: नसांमध्ये जमा झालेलं खराब कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? चुकूनही नका खाऊ हे 3 पदार्थ!

Cholesterol foods to avoid: कोलेस्ट्रॉल वाढल्यास तळलेले पदार्थ, ट्रान्स फॅट, रेड आणि प्रोसेस्ड मीट, जास्त साखर आणि मैद्याचे पदार्थ मर्यादित करणं महत्त्वाचं आहे. ओट्स, भाज्या, फळं आणि नट्ससारख्या फायबरयुक्त पदार्थांचा संतुलित आहारात समावेश करून हृदयाच्या आरोग्याची काळजी घेता येते.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल वाढलेलं कोलेस्ट्रॉल ही अनेकांसाठी चिंतेची बाब झालीये. पण कोलेस्ट्रॉल वाढणं म्हणजे फक्त वजन जास्त असलेल्या व्यक्तीलाच धोका असतो असं नाही. शरीराने बारीक किंवा सामान्य वजनाच्या व्यक्तींच्या रक्तवाहिन्यांमध्येही खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL जमा होऊ शकतं.

तुमच्या रक्त तपासणीच्या रिपोर्टमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याचं समोर आलं असेल किंवा भविष्यात हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करायचा असेल तर आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. काही पदार्थ शक्य तितके कमी करणं किंवा टाळणं फायदेशीर ठरू शकतं.

बाजारात मिळणारे तळलेले पदार्थ

सर्वात आधी तळलेले आणि पॅकेटबंद पदार्थ कमी करण्याकडे लक्ष द्या. समोसे, कचोरी, फ्रेंच फ्राइज, पॅकेटमधले चिप्स अशा पदार्थांमध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण असू शकतं. ट्रान्स फॅट शरीरासाठी चांगलं मानलं जात नाही. यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढू शकतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL कमी होऊ शकतं. त्यामुळे हृदयाचं आरोग्य जपायचं असेल तर अशा पदार्थांचं सेवन शक्य तितकं कमी करावं.

प्रोसेस्ड मीट आणि रेड मीट

मांसाहार करणाऱ्यांनीही आपल्या आहाराकडे थोडं अधिक लक्ष दिलं पाहिजे. मटण, बीफ आणि पोर्क यांसारख्या रेड मीटमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असू शकतं. त्याचा जास्त प्रमाणात आहारात समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.

त्याचप्रमाणे सॉसेज, सलामी, हॉटडॉग यांसारख्या प्रोसेस्ड मीटचं पदार्थही मर्यादित प्रमाणात खाणं चांगलं असतं. हे पदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यामध्ये मीठाचं प्रमाणही जास्त असू शकतं. त्यामुळे अशा पदार्थांचा नियमित आणि जास्त वापर हृदयाच्या आरोग्यासाठी योग्य ठरणार नाही.

जास्त साखर आणि मैद्याचे पदार्थ

गोड पदार्थ आणि कोलेस्ट्रॉलचा संबंध काय असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आहारात साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असणंही शरीरासाठी समस्या निर्माण करू शकतं. मिठाई, कोल्ड ड्रिंक्स, जास्त साखर असलेले पदार्थ तसंच मैद्यापासून तयार केलेले व्हाइट ब्रेड, पास्ता आणि बिस्किटं यांचं जास्त सेवन टाळणं चांगलं.

शरीराला गरजेपेक्षा जास्त साखर मिळाल्यास लिव्हर तिचं रूपांतर ट्रायग्लिसराइड्समध्ये करू शकतं. ट्रायग्लिसराइड्स हा रक्तातील एक प्रकारचा चरबीचा घटक आहे. त्याचं प्रमाण वाढल्यास हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचं असेल तर फक्त तेलकट पदार्थांवरच लक्ष न देता गोड पदार्थ आणि मैद्याच्या पदार्थांचं प्रमाणही कमी करणं महत्त्वाचं आहे.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खाऊ शकता?

  • कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी आहारात फायबरचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करा. ओट्स, हिरव्या भाज्या, फळं आणि बदाम-अक्रोड यांसारखे नट्स आहारात योग्य प्रमाणात घेता येतात.

  • फायबरयुक्त पदार्थ पचनसंस्थेसाठी फायदेशीर असतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात.

  • कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं म्हणजे फक्त एखादा पदार्थ पूर्णपणे बंद करणं नव्हे तर रोजच्या खाण्याच्या सवयींमध्ये योग्य बदल करणं महत्त्वाचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी महापालिका अधिकारी-कर्मचारी संतप्त; महामार्गावर रास्ता रोको

Amit Thackrey : “मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!; अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचा हल्लाबोल

High Court: आईपासून वेगळं हो, बायकोच्या हट्टाला नवऱ्याकडून नकार, शेवटी कोर्टानेच दिला मोठा निर्णय

Swara Bhasker: 'मी राणी पद्मावतीला भित्री म्हटलं नाही...'; त्या प्रकरणावरून ट्रोल झालेल्या स्वरा भास्करचे स्पष्टीकरण

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलायची आहे? UIDAI चा हा नियम नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT