High cholesterol saam tv
लाईफस्टाईल

High cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल 30 दिवसांत कमी कराचंय? आजच हे 3 बदल करा, लगेच दिसेल परिणाम

How to lower cholesterol: हाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार, व्यायाम, वजन आणि ताणाकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. सॅच्युरेटेड फॅट कमी करून फायबर आणि हेल्दी फॅट्स वाढवा. नियमित चालणं, व्यायाम आणि वजन नियंत्रणामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर जीवनशैली तयार करता येते.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि सततचा ताण यामुळे हाय कोलेस्ट्रॉलची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेय. जर शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जीवनशैलीतील काही महत्त्वाचे बदल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

रक्तवाहिन्यांमध्ये का वाढतं कोलेस्ट्रॉल?

कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे आहार आणि जीवनशैलीचा मोठा वाटा असतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टींकडे योग्य पद्धतीने लक्ष दिलं तर कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकतं. मग कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नेमके कोणते बदल करायला हवेत हे जाणून घ्या.

आहारात करा स्मार्ट बदल

तुम्ही दिवसभरात काय खातो याचा थेट परिणाम शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर होऊ शकतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट कमी करा

अनहेल्दी फॅट्सचा आहारातील वापर शक्य तितका कमी करा. प्रोसेस्ड फूड, जास्त तेलात तळलेले पदार्थ, रेड मीट आणि फुल-क्रीम दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ कमी प्रमाणात घ्या. याऐवजी आहारात आरोग्यासाठी चांगले पर्याय निवडण्याचा प्रयत्न करा.

आहारात फायबर वाढवा

सॉल्युबल फायबर शरीरातील खराब म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे रोजच्या आहारात ओट्स, राजमा यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. याशिवाय सफरचंद, संत्री, पेर आणि वेगवेगळ्या भाज्याही भरपूर प्रमाणात खा.

हेल्दी फॅट्सचा समावेश

सगळेच फॅट्स शरीरासाठी वाईट नसतात. मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात आणि चांगल्या म्हणजेच HDL कोलेस्ट्रॉलला मदत करू शकतात. त्यासाठी बदाम, अक्रोड, जवसाच्या बिया, साल्मन, ऑलिव्ह ऑइल आणि अ‍ॅव्होकॅडो यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करता येतो.

व्यायाम महत्त्वाचा

सतत बसून राहणं आणि शारीरिक हालचाल कमी असणे हेही कोलेस्ट्रॉलसाठी चांगलं नाही. नियमित व्यायाम केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत होऊ शकते.

सुरुवात छोट्या उद्दिष्टाने करा

तुम्हाला लगेच जिममध्ये जाण्याची इच्छा नसेल तरी काही हरकत नाही. सुरुवातीला दररोज 30 ते 45 मिनिटं वेगाने चालण्याची सवय लावा. नियमित चालण्यामुळे शरीराची हालचाल वाढेल आणि व्यायामाची सवय लावणंही सोपं जाणार आहे.

एकाच प्रकारचा व्यायाम करू नका

आठवड्यात काही दिवस कार्डिओ एक्सरसाइज करा. यामध्ये सायकलिंग, पोहणं किंवा जॉगिंग यांसारख्या व्यायामांचा समावेश करता येतो. यासोबत काही दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंगही करा. बॉडीवेट एक्सरसाइज आणि योगासनं तुमच्या फायद्याची ठरू शकतात. योगामध्ये सूर्यनमस्कार, कपालभाती प्राणायाम आणि अर्धमत्स्येंद्रासन यांचा कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयोग होऊ शकतो.

दिवसभरातही स्वतःला अ‍ॅक्टिव्ह ठेवा

व्यायामासाठी वेगळा वेळ काढणं शक्य नसलं तरी दिवसभरातील छोट्या-छोट्या सवयी बदलून शारीरिक हालचाल वाढवता येते. यामध्ये शक्य असेल तेव्हा लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करा. जवळच्या दुकानात जायचं असेल तर वाहन घेण्याऐवजी चालत जा. ऑफिसमध्ये बराच वेळ बसून काम करत असाल तर मध्येच छोटा ब्रेक घ्या आणि काही वेळ चालून या.

वजन आणि ताण दोन्ही नियंत्रणात ठेवा

वाढलेलं वजन आणि सततचा ताण यांचाही कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फक्त आहार आणि व्यायामच नाही तर वजन आणि मानसिक ताण याकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

वजन जास्त असेल तर कमी करण्याचा प्रयत्न करा

तुमचं वजन जास्त असेल तर वजनातील फक्त 5 ते 10 टक्के घट देखील कोलेस्ट्रॉलच्या पातळीत सुधारणा करण्यास मदत करू शकते. यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहारासोबत नियमित व्यायाम करणं फायदेशीर ठरू शकतं.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Hotel Fire : झोपेतच काळाचा घाला! श्रावण सोमवारी मंदिराबाहेरील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग, ६ जण जिवंत जळाले अन्

Nagpanchami Special : तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंद, नेमकं काय कारण?

Maharashtra News Live Update: नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी

BJP New Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा आज, कुणाला कोणती जबाबदारी मिळणार? संभाव्य यादी समोर

Famous Actress : ट्रेनमध्ये कपडे काढले, RPF कर्मचाऱ्यावर हल्ला केला; प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

SCROLL FOR NEXT