लाईफस्टाईल

Hair Care Shampoo : केसांना सिल्की व शायनी बनवायचे आहे ? घरच्या घरी तयार करा असा शॉम्पू

Hair Care Tips : आजकाल मार्केटमध्ये नवीन नवीन प्रकारचे शाम्पू आणि कंडिशनर उपलब्ध आहेत.

कोमल दामुद्रे

Homemade Shampoo : केसांची निगा राखण्यासाठी हेअर वॉश करणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल मार्केटमध्ये नवीन नवीन प्रकारचे शॉम्पू आणि कंडिशनर उपलब्ध आहेत. या शाम्पूमध्ये केमिकलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस डॅमेज होऊन गळू लागतात.

अशातच गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या केसांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्ही हर्बल शाम्पूचा वापर केला पाहिजे. हर्बल शॉम्पू तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ग्रीन टी पासून हर्बल शॉम्पू कशा पद्धतीने बनवायला हवा याबद्दल माहिती सांगणार आहोत.

ग्रीन टी फक्त आरोग्यासाठीच (Health) नाही किंवा स्किनसाठी नाही तर, केसांच्या हेल्थसाठी देखील अत्यंत फायदेशीर (Benefits) ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊयात शॉम्पू कसा बनवायचा.

1. शॉम्पू कसा बनवावा :

सामग्री

1. ग्रीन टी ची पाने

2. पेपरमेंट होईल

3. लिंबूचा रस

4. नारळाचे तेल (Oil)

5. मध

6. अॅप्पल साइडर विनेगर

2. ग्रीन टी शॉम्पू बनवण्याची पद्धत :

  • सर्वात आधी ग्रीन टी च्या पानांना सुकवून त्यांची पावडर बनवून घ्या.

  • ग्रीन टी पावडरमध्ये एक चमचा अॅप्पल साइडर विनेगर मिसळून घ्या.

  • ग्रीन टी आणि अॅप्पल साइडर विनेगरच्या मिश्रणात पेपरमेंट ऑइलचे दोन थेंब टाका.

  • त्यानंतर या मिश्रणामध्ये लिंबूचा रस आणि नारळाचे तेल सोबतच मध टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.

3. ग्रीन टी शॉम्पूचे फायदे :

  • ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, ऍमिनो ऍसिड आणि झिंक उपलब्ध असते.

  • जे केसांच्या ग्रोथसाठी अतिशय चांगले मानले जाते. ग्रीन टीचा वापर केल्याने केसांमधील डँड्रफची समस्या दूर निघून जाते.

  • ग्रीन टीच्या शाम्पूपासून केसांना मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि केस घनदाट आणि मजबूत होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

Amboli Tourism : आंबोलीजवळ असलेला छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या श्रावणी सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO

Rutuja Bagwe : ऋतुजा बागवेची नवी इनिंग! सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट, लोकेशन काय?

SCROLL FOR NEXT