Hair Dandruff : केसांमधील कोंडा कायमचा घालवण्यासाठी रामबाण उपाय

How To Get Rid of Hair Dandruff Permanently : थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोक डॅन्ड्रफने ग्रस्त असतात.
Hair Dandruff
Hair Dandruff Saam Tv

Get Rid of Hair Dandruff Permanently At Home : थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोक डॅन्ड्रफने ग्रस्त असतात. अनेक व्यक्तींमध्ये डँड्रफची समस्या एवढी वाढते की त्यांना डोक्यामध्ये खाज येते आणि या कारणामुळे कपड्यांवरती सफेद परत तयार होते. या कारणामुळे अशा व्यक्तींना दुसऱ्या व्यक्तीसमोर लाजल्यासारखे होते.

डेंजरस अनेक कारणांमुळे होऊ शकतो. डँड्रफमुळे तुमची केस (Hair) कमजोर पडतात आणि तुटू लागतात. त्याचबरोबर केसांची वाढ खुंटते. तुम्ही सुद्धा या समस्येने ग्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला एक टीप सांगणार आहोत. आम्ही सांगितलेल्या उपायाने तुमचा डँड्रफ कायमचा निघून जाईल.

Hair Dandruff
Hair Care Tips : केस गळती थांबवण्यासाठी व नवीन केस उगवण्यासाठी उपयुक्त आहे का कांद्याचा रस? जाणून घ्या

नारळाच्या (Coconut) तेलामध्ये आणि कापूरमध्ये अँटी फंगल आणि अँटिबॅक्टरियल गुणधर्म उपलब्ध असतात. नारळाचे तेल डँड्रफ आणि खाजेपासून आराम देते. नारळाच्या तेलामध्ये आणि कापूरमध्ये विटामिन आणि खनिजे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.

अशातच कापूर तुमच्या केसांमध्ये डँड्रफ घालवण्यासाठी अत्यंत मदत करतो. यामध्ये अँटिबॅक्टरियल गुणधर्म उपलब्ध असतात वेड अँड्रफ मुळापासून गायब करण्यासाठी मदत करतात. सोबतच हे ब्लड सर्क्युलेशनला झपाट्याने वाढवते आणि केसांचे कोरडेपण दूर करते.

Hair Dandruff
Combing Hair : केस विंचरण्याची योग्य पद्धत काय आहे? जाणून घ्या फायदे

अशा पद्धतीने तयार करा मिश्रण -

दोन कापूरच्या गोळ्या घेऊन त्यामध्ये एक कप नारळाचे तेल मिक्स करा. त्यानंतर कापूर आणि तेलाच्या वाटीला एका मोठ्या पातेल्यामध्ये ठेवून गरम करून घ्या. जोपर्यंत कापूर तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत गॅस बंद करू नका.

लावण्याची पद्धत -

कापूर आणि नारळाचे तेल हलकी कोमट झाल्यावर केसांमध्ये मधोमध भांग पाडून सर्वात आधी मधल्या भागामध्ये तेल कॉटनच्या सहाय्याने अप्लाय करा. त्यानंतर एकेक सेक्शन पाडून केसांना व्यवस्थितपणे तेल अप्लाय करून घ्या. संपूर्ण डोक्याला तेल लावल्यानंतर हलक्या हाताने डोक्याची मालिश करा. सकाळी उठल्यावर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन काढा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com