एक्सरसाईज हा उत्तम आपरोग्यासाठी एक सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. प्रत्येक व्यक्तीला तिच्या आयुष्यात अनेक आजार, कोणत्याना कोणत्या रोगाची लागणं, वाढत्या वजनाच्या किंवा कमी वजनाच्या समस्या होत असतात. त्यावर जर वेळीच उपचार केले नाहीत तर मोठमोठ्या हॉस्पिटलकडे धावा घ्याव्या लागतात. तसेच त्यात अर्धी जमा पुंजी खर्च होते. या बाबींपासून लांब राहण्यासाठी तुम्ही एक्सरसाईज हा पर्याय निवडता.
एक्सरसाईज नियमित केल्याने ह्दयाचे आरोग्य चांगले राहतं, वजन नियंत्रणात राहतं, आणि मेंटल हेल्थ ठीक राहते. त्यासाठी लोक चालायला जातात, काही लोक सायकलिंग करतात, तर काही लोक धावायला जातात. अशात नेमकी कोणती एक्सरसाईज वजन नियंत्रणासाठी किंवा फीट राहण्यासाठी योग्य आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे? या प्रश्नांचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
नियमित चालल्याने होणारे फायदे
रोज चालल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत होतं आणि ह्रदयाचं आरोग्य चांगलं राहतं. या प्रक्रीयेमुळे तुमच्या शरीरातल्या कॅलेरीजचे बर्न होतात आणि तुमचं वजन कमी होण्यास सुरूवात होते. वजन कमी करण्यासाठी चालणं हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. ज्यामुळे जॉइंटमधील लवचिकपणा कायम राहतो, मासंपेशी मजबूत होतात. या सर्व कारणांनी तुमचं वजन झटक्यात कमी होऊ लागतं.
धावल्याने वजन कमी होतं का?
जॉगिंग करताना चालणं आणि धावणं या मधील स्थिती आपण करतो. त्यामुळे ही एक हाय इन्टेन्सिटी एक्सरसाईज आहे. शरीराचा स्टॅमिना वाढतो आणि शरीरात अधिकाअधिक कॅलरी बर्न करण्यासाठी जॉगिंग एक्सरसाईज फायदेशीर ठरते.
सायकलिंग करणं
जितका वेळ तुम्ही सायकल चालवता तेवढा वेळ गुडघ्यांवर पडणारा तणाव कमी होतो. सायकल चालवल्याने आरोग्य सुद्धा उत्तम राहतं. शिवाय सायकल चालवल्याने गुडघ्यांची जुनी ऑस्टियोआर्थरायटिसची समस्या दूर होऊ शकते आणि गुडघ्यांवर कार्य सुधारतं.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Written By : Sakshi Jadhav