Pregnancy Exercises : गरोदरपणात 'या' एक्सरसाईज बाळासाठी महत्वाच्या; डिलीवरी होईल नॉर्मल

Exercises During Pregnancy : गरोदरपणात महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे. तसेच कोणता व्यायाम केला पाहिजे आणि कोणता नाही याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
Exercises During Pregnancy
Pregnancy Exercises Saam TV
Published On

गरोदरपणात प्रत्येक महिलेची काळजी घेतली जाते. आई होणे हा प्रत्येक महिलेसाठी एक खास अनुभव असतो. या अनुभवासाठी प्रत्येक महिला वाट पाहत असते. जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा सुरुवातीला ३ महिने फार महत्वाचे असतात. या तीन महिन्यांमध्ये महिलेला सावकाश चालणे, उड्या न मारणे, जड सामान न उचलणे अशा सूचना दिल्या जातात. या सूचना फॉलो न केल्यास बाळ दगावण्याची शक्यता जास्त असते.

Exercises During Pregnancy
Pregnancy Care: प्रेग्नेंसीच्या काळातील 'या' चुकांमुळे होतील गंभीर परिणाम

बाळ पोटात असताना महिलेची सर्वजण काळजी घेतात. महिलेला कोणतंही काम करू देत नाही. मात्र या काळात काळजी घेत महिलेने काही महत्वाच्या एक्ससाइज करणे सुद्धा महत्वाचे असते. कारण त्याने बाळ सुदृढ आणि निरोगी राहते. शिवाय महिलेला डिलीव्हरी दरम्यान जास्त वेदना होत नाहीत. त्यामुळे आज त्यात एक्सरसाइज बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

कितीवेळ व्यायाम करावा

गर्भवती महिलांनी १५० मिनिटे व्यायाम काराव. काही महिला दिवसातून अगदी १५ ते २० मिनिटे व्यायाम करू शकतात. व्यायाम कराताना तुम्ही आधी वेळेसाठी डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता.

चालणे

गर्भवती महिलेसाठी चालणे ही उत्तम एक्सरसाइज आहे. शरीराला चाल असेल तर शरीर सुदृढ राहतं. तुम्ही आरामदाई बुटं घालून रोज आर्धातास तरी चाललं पाहिजे. कारण याने तुमचं वजन जास्त वाढणार नाही. शिवाय बाळाचे पाय देखील मजबूत होतील.

स्विमींग

प्रेग्नंट असताना तुम्ही स्विमींग करू शकता. स्विमींग केल्याने गरोदरपणात पायांवर आलेली सूज कमी होण्यास मदत होते. ज्या महिलांना पाठीत खालच्या बाजूला दुखते त्यांनी स्विमींग करणे सुरू केले पाहिजे. त्याने हा त्रास देखील कमी होतो.

योगा करा

प्रेग्नेंसीमध्ये प्रत्येक महिलेने योगा केला पाहिजे. त्यासाठी अगदी साधे साधे योगा आणि त्याची सुरुवात प्राणायम करण्यापासून केली पाहिजे. योगा केल्याने तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी वाटते. तसेच शरीरात काही अवयव दुखत असतील किंवा विकनेस आला असेल तर तो दूर होतो आणि एनर्जी मिळते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Exercises During Pregnancy
Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट आहे का? विकी कौशलने दिलं प्रामाणिक उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com