Vitamin D without sunlight winter tips  google
लाईफस्टाईल

Vitamin D Sources: सूर्यप्रकाशाशिवाय व्हिटॅमिन D कसं मिळवाल? फक्त हे बदल करा अन् थंडीत राहा निरोगी

Winter Immunity Boost: सूर्यप्रकाश कमी मिळत असताना फॅटी फिश, UV-ट्रीटेड मशरूम आणि अंडी या अन्नातून भरपूर व्हिटॅमिन D मिळू शकतं. हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी हे पर्याय अत्यंत उपयुक्त आहेत.

Sakshi Sunil Jadhav

व्हिटॅमिन D शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हाडे मजबूत ठेवणे आणि मूड सुधारण्यास मदत करणारा हा फॅट-सोल्युबल न्यूट्रिएंट आहे. सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन D मिळतं हे खरंय, पण सतत बाहेर जाणं शक्य नसणं, ढगाळ वातावरण, हिवाळ्याचे दिवस किंवा स्किन एक्सपोजर टाळायचे असल्यास काय कराल? अशावेळी काही अन्नपदार्थ नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन D पुरवतात. घरातून बाहेर न पडता व्हिटॅमिन D मिळवण्याचे हे तीन सोपे पर्याय जाणून घ्या.

फॅटी फिशचा आहार घ्या

सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन्स या फॅटी फिशमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D आढळतं. जवळपास ३ अंश सॅल्मनमध्ये ५७० IU पर्यंत व्हिटॅमिन D मिळू शकतं, तर प्रौढांसाठी दररोजची ६०० IU अशी आहे. त्यामुळे महागडे सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा हा नैसर्गिक आणि परवडणारा ठरू शकतो. शिवाय या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्सही असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

हिवाळ्यात मशरूम खाण्याचे फायदे

मशरूम हा आणखी एक उत्तम पर्याय, विशेषतः शाकाहारी लोकांसाठी हा पर्याय बेस्ट आहे. सामान्य मशरूममध्ये प्रमाण कमी असले तरी मशरूम शिजवल्यानंतर १०० ते २०० IU व्हिटॅमिन D मिळू शकतं. मात्र खरा फरक पडतो तो UV-एक्सपोज्ड मशरूममध्ये. UV किंवा सूर्यप्रकाशात ठेवलेल्या ऑइस्टर किंवा शिटाके मशरूममध्ये एका सर्व्हिंगमध्ये तब्बल १,००० IU पर्यंत व्हिटॅमिन D मिळू शकतं. त्यामुळे बाजारातून UV-ट्रीटेड मशरूम खरेदी करणे किंवा ताज्या मशरूमना शिजवण्यापूर्वी एक तास सूर्यप्रकाशात ठेवणे हा उत्तम उपाय आहे. सूप, स्टिर फ्राय, ऑम्लेट किंवा लसूण-मशरूममध्ये हे सहज वापरता येते.

अंडी जास्त प्रमाणात खावीत

लोकप्रिय आणि सहज उपलब्ध पर्याय म्हणजे अंडी. एका मोठ्या अंड्याच्या पिवळ्या भागात सुमारे ४४ IU व्हिटॅमिन D असते. नाश्त्यात अंडी ही बहुतेक घरी रोजचीच गोष्ट असल्याने त्यांचा समावेश करणे अगदी सोपे जाते. व्हिटॅमिन D मिळवण्यासाठी अंड्याचा पिवळा भाग खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अंडी आणि व्हिटॅमिन D-फोर्टिफाइड दूध किंवा संत्र्याचा रस एकत्र घेतल्यास त्यांचे फायदे आणखी वाढतात. अंडी व्हिटॅमिन A, B2, B5, B6, B12, E, K तसेच फोलॅट, फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम आणि झिंकनेही समृद्ध असतात.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेतला राडा भोवला, पडळकर अन् आव्हाड समर्थकांना तुरुंगवासाची शिक्षा|VIDEO

Border 2: सनी देओलची फौज 'बॉर्डर 2' साठी तयार; चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर

Women iron deficiency: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये आयर्नची कमतरता का असते अधिक? काय असू शकतात कारणं जाणून घ्या

Samuruddhi Kelkar Video: अवखळ हासरी, अल्लड लाजरी; समृद्धी केळकरला पाहून चाहते झाले खुश

Vinesh Phogat: विनेश फोगाटचं कमबॅक! निवृत्तीचा निर्णय मागे; २०२८ मध्ये ऑलिम्पिकमध्ये खेळणार

SCROLL FOR NEXT