Viral Trend On X Saam Tv
लाईफस्टाईल

Viral Trend On X: सध्या #ClickHere ट्रेंडिंगमध्ये का आहे? वाचा सविस्तर

#ClickHere Trend: आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर #ClickHere नावाचं नवीन चॅलेंज चर्चेत आहे. आपण हे चॅलेंज ट्रेंडिंगमध्ये का आहे, ते जाणून घेऊ या.

Rohini Gudaghe

What Is Click Here #ClickHere Trend

आजचा काळ सोशल मीडियाचा आहे. हे युग सोशल मीडियाचं युग असल्याचं आपण म्हणतो. सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे ट्रेंड व्हायरल होत आहेत. आजकाल (Viral Trend On X) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक नवीन चॅलेंज चर्चेत आहे. हे चॅलेंज #ClickHere नावाने ओळखलं जात आहे. आपण हे चॅलेंज ट्रेंडिंगमध्ये का आहे, ते जाणून घेऊ या.  (latest viral news)

या ट्रेंडमध्ये प्रत्येकाने स्वतःचे मत व्यक्त केलं आहे. हे ट्रेंड हजारो पोस्ट्सनी भरलेलं आहे. राजकीय नेत्यापासून प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला या चॅलेंजचं वेड लागलं आहे. सकाळपासून सोशल मीडियावर #ClickHere नावाचं चॅलेंज दिसत आहे. हे चॅलेंज नक्की काय आहे ते आपण पाहू या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

#ClickHere ट्रेंड काय आहे?

#ClickHere नावाची प्रतिमा एका साध्या पांढऱ्या पृष्ठावर ठळक काळ्या फॉन्टने लिहिलेली आहे. ती तिरकस बाणासारखी दिसते. ही प्रतिमा पाहिल्यानंतर त्याचं स्वरूप काय आहे? असा प्रश्न पडतो. हे चॅलेंज Alt Text फीचरचा एक भाग आहे. यामध्ये तुम्ही तुमचं मत 420 शब्दांपर्यंत व्यक्त करू शकता.

या चॅलेंजमध्ये जेव्हा तुम्ही फोटो अपलोड कराल तेव्हा बाजूला alt लिहिले जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर त्या प्रतिमेचं वर्णन लिहिलं (Viral Trend) जाईल. यामध्ये तुम्ही हवं ते लिहू शकता. जेव्हा इतर कोणी तुमच्या alt वर क्लिक करेल, तेव्हा तुम्ही जे लिहिले आहे तो मजकूर दिसेल.

त्या इमेजबद्दल स्पष्टीकरण देखील देऊ शकता. Alt Text फीचर X वर 2016 मध्ये सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आता लोकांना हे चॅलेंज दिसताच त्याचा वापर करायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झालाय की, ते एक चॅलेंज बनलं आहे. आता ते X (पूर्वीचे ट्विटर) वर ट्रेंडिंगमध्ये प्रथम येऊ लागलं आहे. या चॅलेंजवर लोक आता त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

या ट्रेंडमध्ये सर्वसामान्यांव्यतिरिक्त राजकीय पक्ष भाजपही सामील झाला आहे. मोदी सरकार आणि आम आदमी पार्टीनेही या ट्रेंडचा फायदा घेतला आहे. भाजपने त्यांच्या पोस्टच्या Alt मजकूर विभागात हिंदीमध्ये त्यांनी 31 मार्च रोजी होणाऱ्या मेगा रॅलीचा संदेश दिला (#ClickHere Trend) आहे. तसे, हे नवीन चॅलेंज तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा. याआधी एकदा ते वापरून पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

SCROLL FOR NEXT