Mande Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Mande Recipe : विदर्भ स्टाइल खमंग मांडे कसे बनवायचे? झटपट वाचा रेसिपी

Vidarbha Style Mandi Recipe : विदर्भ स्टाइल खमंग मांडे घरच्याघरी कसे बनवायचे याची रेसिपी अनेक व्यक्तींना माहिती नाही. त्यामुळे आज ही रेसिपी आपण जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

आपल्या भारतात विविध संस्कृती जपल्या जातात. यामध्ये प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी विदर्भ स्टाइल स्पेशल अशी मांडेंची रेसिपी शोधली आहे. मांडे चवीला इतके मस्त लागतात की तुम्ही कोणत्याही भाजीसह हे मांडे खाऊ शकता.

साहित्य

लोकवन गव्हाचे पीठ

मीठ

पाणी

कृती

परफेक्ट मांडे बनवण्यासाठी तुम्हाला लोकवन गहू घ्यावा लागेल. लोकवन गहू चिकट असतात. या गव्हामध्ये असलेला चिकटपणा मांडे बनवण्यास मदत करतो. त्यामुळे लोकवन गव्हाचे पीठ घ्या. या पिठात चवीनुसार मीठ मिक्स करा. मीठ मिक्स केल्यावर थोडं थोडं पाणी मिक्स करून पिठाची मस्त कणीक मळून घ्या.

तयार कणीक आपल्याला अगदी पातळ करून घ्यायची आहे. त्यामुळे एका भांड्यात पिठाचा थोडासा गोळा घेऊन त्यात थोडं थोडं मिक्स करत राहा. पाणी मिक्स करताना पिठात एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही जितके चांगल्या पद्धतीने पीठ तयार कराल तितकेच मांडे छान आणि चवदार बनतात.

पीठ मळून झाल्यावर ते आणखी सैल आणि पातळ व्हावे यासाठी यामध्ये तेल मिक्स करा. थोडं थोडं तेल टाकून मांडेचे पिठ मळून घ्या. तयार कणीक १५ मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर थोडं थोडं पिठ घेऊन तुम्ही हातावर मांडे बनवू शकता. मांडे बनवताना ते हातावर तुम्हाला चपाती लाटतात तसे लाटता येत नाहीत. त्यामुळे हात स्वच्छ करून त्यावर पिठाचा मोठा आकार तयार करा.

तयार मांडे भाजण्यासाठी तुम्हाला खापराचा वापर करावा लागेल. त्यासाठी खापर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. तसेच तयार मांडे यावर टाकून भाजून घ्या. मांडे भाजताना त्यावर तेल लावण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तेल न लावता सुद्धा मांडे भाजू शकता. अशा पद्धतीने तयार झाले विदर्भ स्टाईल मऊ लुसलुशीत मांडे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT