ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सतत मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर सध्या सर्वांकडून होत असतो.
अशात डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत.
जर डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे वाटत असल्यास पुढील पदार्थांचा आहारात समावेश करावा.
आहारात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
गाजरात डोळ्यांसाठी आवश्यक असे व्हिटॅमिन असल्याने आहारात गाजराचा समावेश असावा.
दिवसभरात पाणी पिण्याचे प्रमाण आवश्यक असे ठेवावे.
कडधान्याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.