Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

First FIR Registered for Feeding Pigeons: उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबईतील कबुतरखान्यात कबुतरांना खायला घातल्याबद्दल पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय. माहिममध्ये अनोळखी इसमाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र मुंबईत किती कबुतरखाने आहेत पाहूयात.
Pigeons
First FIR Registered for Feeding Pigeonssaamtv
Published On

माहिमच्या एल. जे रोडवर कबुतरांना खाद्य घातल्याने एका अनोळखी चारचाकी चालकाविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७० आणि २७१ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. संपूर्ण मुंबईत किती कबुतरखाने आहेत याची माहिती घेऊया.

मुंबईत एकूण 51 कबुतरखाने आहेत

मलबार हिल- 04

गिरगाव- 04

वरळी- 03

दादर- 01

वांद्रे पूर्व- 04

अंधेरी- 6

गोरेगाव- 03

मालाड- 10

तर दादरमधील कबुतरखाना तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला नागरिकांनी जोरदार विरोध केलाय. ब्रिटीश काळापासून मुंबईत कबुतरखाने आहेत. त्यातील काही कबुतरखान्यांना धार्मिक आणि सामाजिक संदर्भ आहेत... मात्र गेल्या काही वर्षात कबुतरांना खायला टाकणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आणि कबुतरांच्या संख्येतही मोठी वाढ झाली.. त्यामुळे नागरिकांचा श्वसनाच्या आजारामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या... त्यामुळे अखेर उच्च न्यायालयाने कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.

Pigeons
Mumbai local train Dispute : तिकीटावरून लोकलमध्ये वाद; रेल्वेच्या कार्यालयाची तोडफोड

3 जुलै

मुंबईतील 15 कबुतरखाने ताबडतोब बंद कऱण्याचा निर्णय

3 जुलै

कबुतरांना खायला टाकणाऱ्यांविरोधात 500 रुपयांच्या दंडाचा निर्णय

11 जुलै

महापालिकेकडून कबुतरखान्यांवर छापेमारी करत 61 हजार रुपयांचा दंड आणि खाद्य जप्त

12 जुलै

धार्मिक स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक वारशाचं उल्लंघनाचं कारण देत उच्च न्यायालयात याचिका

13 जुलै

कबुतरांमुळे आरोग्याला हानी पोहचत असल्याचे वैद्यकीय पुरावे देण्याचे आदेश

31 जुलै

बेकायदेशीरपणे कबुतरांना खाद्य देणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पहिला गुन्हा दाखल झाला असला तरी पक्षीप्रेमींचा विरोध तीव्र होतोय.. त्यामुळे सर्व जनतेचं आरोग्य महत्वाचं की काही नागरिकांच्या भावना याचा विचार करणं आता गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com