Sakshi Sunil Jadhav
अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता. आजचा दिवस एखाद्याच्या खांद्यावर ओझे असा जाईल.
प्रेमामध्ये वेगळा काहीतरी पराक्रम घडेल. आपल्यातील उमेद नव्याने जागी होईल.
मानसिक ताण आणि तणाव यांनी भरलेला आजचा दिवस आहे. जवळच्या लोकांशी संबंधित दिवस व्यतीत केल्यास मनाला आधार वाटेल.
प्रेमामध्ये रंग भराल. शेअर्समधील गुंतवणूक चांगली ठरेल. शिव उपासना करा.
जागेच्या व्यवहारामध्ये आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. घरी नवीन वस्तूची खरेदी होईल.
लेखन, प्रकाशन मार्गातून प्रगती आहे. जवळचे प्रवास होतील. कुटुंबीयांसाठी विशेष खर्चही कराल.
धनाची आवक जावक चांगली राहील. मनस्वास्थ्य उत्तम राहील. दिवस आनंदी आहे.
स्वतःसाठी अनेक गोष्टी आनंदात भर घालणाऱ्या कराल. एकटे असाल तरीसुद्धा आज त्याविषयी खंत वाटणार नाही.
प्रियकर प्रेयसी बरोबर विनाकारण वाद-विवाद होतील. कदाचित नाते तुटते आहे की काय असे भावना होईल. मनोबल कमी राहील.
जुन्या मैत्री भेटीगाठी यामधून दिवस आनंदी राहणार आहे. गुंतवणुकीतून विशेष लाभ होणार आहेत. दिवस सौख्य घेऊन आलेला आहे.
जे ठरवाल ते आज होईल. कामाला कामाचेच भरते येईल. प्रवासही घडतील मानसन्मान, पैसा, प्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल.
सद्गुरु कृपा राहील. भाग्यकारक घटनांचा आजचा दिवस आहे. नवनवीन आव्हाने लिलया पेलवून यश सहज मिळून जाईल.
NEXT : 2025 NaraliPurnima : नारळी पौर्णिमेचे दुसरे नाव काय आहे?