Sakshi Sunil Jadhav
श्रावण एकदा सुरु झाला की, सणांची एका मागोमाग एक रांगच लागते.
नागपंचमी, रक्षाबंधन या नंतर येणारा महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आहे.
यंदा नारळी पौर्णिमा १९ ऑगस्टला सोमवारी असणार आहे.
नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राची विधीवत पूजा आणि नारळ अर्पण करतात.
तुम्हाला माहितीये का? नारळी पौर्णिमेला दुसरे नाव काय आहे?
नारळी पौर्णिमा हा सण रक्षाबंधनाच्या दिवसात येत असल्यामुळे त्याला राखी पौर्णिमा असे म्हणतात.
नारळी पौर्णिमेला शंकरासह वरुण देवतेची पूजा केली जाते.