Vegetable Price High Saam TV
लाईफस्टाईल

Vegetables Price: भाज्यांचे दर वाढल्याने सामान्यांना फुटला घाम; फरसबी, वाटाण्यासह दोडक्याचे दर १०० पार

Today's Vegetable Rate Increased: उत्पादन कमी झाल्याने २० ते ३० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या भाज्यांच्या दरांनी थेट शंभरी पार केली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे.

Ruchika Jadhav

राज्यात जून महिन्याला सुरूवात होताच अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र अद्यापही दुष्काळ असलेली गावं पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दुष्काळाचा परिणाम थेट भाजीपाल्याच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन कमी झाल्याने २० ते ३० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या भाज्यांच्या दरांनी थेट शंभरी पार केली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ बाजारात फरसबी, वाटाणा आणि दोडका या भाज्यांच्या किंतमी १५० हून अधिक झाल्यात. आज या भाज्यांचा भाव १६० रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. या महिन्यात अखेरपर्यंत भाज्यांचे दर असेच कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी २२४२ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये पालेभाज्यांच्या ४ लाख ६० हजार जुड्या आहेत. तर १३५ टन गाजर, १६९ टन कोबी आणि १८३ टन टोमॅटोची आवक झाली आहे.

या तीन भाज्या वगळता इतर भाज्यांची आवक मोठ्याप्रमाणावर घसरली आहे. फरसबी फक्त ८ टन आलीये. तर टोमॅटो फक्त ७ टन आलेला आहे. त्यामुळे समितीमध्ये १०० ते १२० आणि किरकोळ मार्केटमध्ये १४० ते १६० रुपये किलो दराने फरसबी आणि टोमॅटो विकले जात आहेत.

वाटाण्याची आवक तब्बल ८३ रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे होलसेल बाजारात वाटाणा १२० रुपये किलो आणि किरकोळ बाजारात मार्केटमध्ये वाटाणा १६० रुपये किलो आहे. ढोबळी मिरची ८० ते १०० रुपये किलो आहे. शेवग्याच्या शेंगा १०० ते १२० रुपये किलो आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात वरणभाता ऐवजी कोणते पदार्थ नैवेद्यात ठेवू शकतो?

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरसह वसई-विरार शहरात पावसाची रिपरिप

Couple Gemini Photo: जोडीदारासोबत रेट्रो लूक करायचाय? पण जमत नाही, ट्राय करा 5 ट्रेडिंग Prompt

Vicky Jain: 'कपड्यांवर अन् वॉशरूममध्ये रक्त...; अंकिताच्या नवऱ्याने स्वत: सांगितला कसा झाला अपघात

Samruddhi Kelkar: केसात गजरा अन् हिरवी साडी, समृद्धी केळकरच्या मेहंदीचे फोटो पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT