vegetable cheeze pocket recipe yandex
लाईफस्टाईल

Easy Tiffin Box Recipe : मुलांच्या डब्यासाठी सकाळी झटपट बनवा हेल्दी अन् टेस्टी मिक्स व्हेजिटेबल चीझ पॅाकेट रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोजच्या धावपळीत प्रत्येक आईला मुलांसाठी काय बनवायचं असा प्रश्न पडत असतो. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानांच बाहेरचे पदार्थ खायला आवडतात. पण त्याचबरोबर बाहेरचे चमचमीत पदार्थ खाण्याची सर्वानां इच्छा होत असते. त्यामुळे प्रत्येकजण नवनवीन पदार्थ ट्राय करत असतो. पण रोज बाहेरचे पदार्थ खाल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून आज तुमच्यासाठी व्हेजिटेबल चीझ पॅाकेटची रेसिपी घेवून आलो आहेत. व्हेजिटेबल चीझ पॅाकेट रेसिपी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता.

त्याचबरोबर ही रेसिपी आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे. या रेसिपीमध्ये सर्व भाज्यांचा समावेश असल्याने ही रेसिपी सर्व वयोगटासाठी उत्तम आहे. तुम्ही अवघ्या थोड्या वेळातच व्हेजिटेबल चीझ पॅाकेटची रेसिपी सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तयार करु शकता. जाणून घ्या रेसिपी.

साहित्य

उकडलेले बटाटे

किसलेले गाजर

बारीक चिरलेला कांदा

बारीक चिरलेली शिमला मिरची

मक्याचे दाणे

आलं आणि हिरवी मिरची पेस्ट

गरम मसाला

मीठ

साखर

कोथिंबीर

ब्रेड स्लाइस

मैदा

पाणी

तेल

लाल मिरची पावडर

मोझरेला चीझ

ब्रेडचा चुरा

बनवण्याची पद्धत

प्रथम एक बाउल घ्या. त्यात उकडलेला बटाट कुस्करुन घ्या. नंतर त्यात किसलेले गाजर, शिमला मिरची , बारीक चिरलेला कांदा, मक्याचे दाणे , लाल मिरची पावडर, आलं- मिरची पेस्ट , गरम मसाला, साखर, मीठ ,आणि कोथिंबीर टाकून अॅड करुन घ्या. त्यानंतर बाउल मधील सर्व मिश्रणाला नीट एकजीव करुन घ्या. एकजीव केलेल्या मिश्रणाचे नीट पीठ तयार करुन घ्या. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये ब्रेडच्या स्लाइस घ्या. यानंतर ब्रेडच्या स्लाइसवर मोझरेला चीझ हाताच्या साहाय्याने पसरवा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण या ब्रेडच्या स्लाइसवर अॅड करुन लावा.

यानंतर एका ब्रेड स्लाइसचे आपल्या सोयीनुसार भाग करुन घ्या. यानंतर पुढच्या स्टेपमध्ये एका वाटीमध्ये थोडासा मैदा घ्या. त्या मैदामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ टाकून चांगले मिक्स करुन घ्या. या मिश्रणाचे पातळ असे बॅटर तयार करा. नंतर त्यामध्ये तयार केलेले ब्रेडचे स्लाइस डिप करा. डिप केलेले स्लाइस ब्रेडच्या चुऱ्यामध्ये मिक्स करुन घ्या.

यानंतर गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. नंतर त्यात तेल टाकून तेल गरम होऊ द्या. यानंतर गॅसला लो फेमवर करुन आपले व्हेजिटेबल चीझ पॅाकेट तळून घ्या. व्हेजिटेबल चीझ पॅाकेटचा रंग ब्राऊन झाल्यावर त्यांना बाहेर काढा. तुम्ही हे व्हेजिटेबल चीझ पॅाकेट सॅास सोबत सर्व्ह करु शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

Fashion Tips : बॅगी जीन्ससोबत ट्राय करा 'हे' टॉप्स, फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!

SCROLL FOR NEXT