WHO
WHOSaam Tv

WHO: पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त आळशी, WHO ने का दिला इशारा, नेमकं कारण काय?

WHO Alert For Indian Women: WHO ने भारतीय महिलांसाठी इशारा दिला आहे. भारतीय महिला या पुरुषांपेक्षा जास्त आळशी असल्याचे अहवालात समोर आले आहेत.
Published on

रोजच्या जीवनात सर्वच नागरिक सोशल मिडिया मोठ्या प्रमाणात वापरत असतात. देशभरात सोशल मिडिया अॅप वापरण्याचं सर्वांना वेड आहे. महिला असो वा पुरुष कधी ऑफिसला जाताना सोशल मिडिया वापरत असतात . सोशल मिडिया पाहण्यात कधीकधी आपला बराच वेळ निघून जात असतो. पण हे कोणालाच समजत नाही.

सोशल मिडिया पाहण्यात सर्व नागरिक इतके रमलेले आहेत की त्यांना बाहेर काय चालू आहे, हे देखील समजत नसतं. यामुळे WHO ने महिलांसाठी एक आरोग्याचा इशारा दिला आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की, महिला सोशल मिडिया साईट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. यामुळे महिला जास्त प्रमाणात आळशी आहेत. या सर्व कारणांमुळे महिलांच्या आरोग्यात खूप काही बदल होणार आहेत.

WHO
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला ही कामे नक्की करा; वर्षभर घरात धनसंपत्ती राहिल

WHO च्या अहवालानुसार, देशभरात ५७ टक्के भारतीय महिला पुरुषांपेक्षा आळशी आहेत. या गोष्टीचं कारण म्हणजे सोशल मिडिया साईट्स आहे. महिला एकाच ठिकाणी बसून सतत मोबाईल वापरत आहेत तर कधी एकाच ठिकाणी बसून आपली सर्व कामे पूर्ण करत आहेत. यामुळे महिलांची शारिरिक हालचाल होत नाही आहे. या सर्व कारणांमुळे त्यांना अनेक आजारांना सोमोरे जावे लागणार आहे. यामुळे महिलांनी वेळीच सावध राहणे गरजेजे आहे. wHOच्या मदतीने महिलांना आरोग्यासाठी चांगले राहण्याचे आव्हान दिले जात आहे.

महिलांच्या ५७ टक्के आकडेवारीमध्ये २०३० साला पर्यंत ६० टक्क्यांपर्यत वाढ होणार आहे. महिलांच्या या आळशीपणामुळे त्यांना ह्रदयविकार, मधुमेह,कर्करोग यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता दर्शवली आहे.

महिलांना आळशी बनवण्याचे कारण FOMO (Fear Of Missing Out) आहे

देशभरातील लाखो महिला सोशल मिडिया साईट्स मोठ्या प्रमाणात वापरत आहे. त्यामुळे त्याच्यां जीवनात सोशल मिडिया साईट्सला खूप महत्व आहे. महिला रोजच्या जीवनात सोशल मिडिया जास्त वेळ वापरत असल्याने त्यांना कोणत्याच गोष्टीचे भान राहत नाही आहे.

सोशल मिडियामुळे महिलांच्या मनोरंजनामध्ये वाढ

महिला सोशल मिडियामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब, मोठ्या प्रमाणात वापरत आहे. त्याचबरोबर त्यांच्या मनोरंजनामध्ये त्या टिव्ही आणि वेबसिरिज देखील स्वत:च्या मनोरंजनासाठी पाहत आहे. यामुळे त्यांचा रोजचा दैनंदिन दिवस खूप आनंदाने जात आहे. एकाच ठिकाणी बसून महिला सोशल साईट्स पाहत असल्याने त्यांच्या शारीरिक हालचाली कमी होत आहे. या कारणांमुळे त्यांचे शरीर लठ्ठ होत आहे. महिलांना या लठ्ठपणामुळे अनेक आजारानां सामोरे जावे लागणार आहे.

महिलांच्या झोपेचे प्रमाण कमी

महिलांना घरातील कामांबरोबर ऑफिसची सुध्दा कामे करावी लागत असतात. त्याबरोबर त्यांना प्रत्येक कामाची जबाबदारी असते. अशा वेळेस महिला आपल्या आवडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी झोप कमी करत असतात. रोजच्या जीवनात पुरेशी झोप नाही मिळल्यामुळे महिलांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे, स्मरणशकती नाही वाढणे, स्वत:वर लक्ष केद्रिंत नाही करणे, सतत नैराश्य सारखे वाटत राहणे यांसारख्या समस्यांचा सामना करत आहे.

WHO
Chirote Recipe : नाजूक पाकळ्या आणि खुसखुशीत चिरोटे; कमी साहित्यात घरच्याघरी बनवा रेसिपी

महिलांनी स्वत:साठी फिटनेसवर फोकस करा

देशभरातल्या लाखो महिला खूप आळशी असल्याने त्यांचे स्वत:च्या फिटनेसवर अजिबात लक्ष नाही आहे. महिला रोजच्या जीवनशैलीत फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खात आहे. त्याचबरोबर महिला एकाच ठिकाणी बसून लठ्ठ होत आहे. यामुळे महिलांना वजन कमी करण्याचा विचार येत असतो. म्हणून महिलांनी स्वत:च्या आरोग्यावर खूप लक्ष दिले पाहिजे. यासाठी महिलांनी दररोज व्यायाम, योगा, जीम यांचा किमान एक तास तरी उपयोग केला पाहिजे. यामुळे महिलांची शारिरीक हालचाल होईल त्याचबरोबर शरीर सुदृढ राहण्यास मदत होईल.

महिलांनी योग्य आहार घ्यावा

महिला नेहमीच स्वत:ची काळजी घेत नाही. महिला आहाराबरोबर स्वत:च्या अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतात. म्हणून महिलांनी फिटनेस बरोबर स्वत:च्या आहारात संपूर्ण घटकांचा समावेश करायला हवा. यामुळे महिला नेहमी तंदुरुस्त राहतील.

WHO
Kurla Travel : मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात फिरायला वेळ नाही; मग कुर्ल्यातील 'या' ठिकाणी नक्की जा, पुढच्या वीकेंडपर्यंत रहाल फ्रेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com