संपूर्ण देशभरात सोशल मिडिया पाहण्याचं खूप वेड आहे. सोशल मिडिया पाहण्यात सर्व नागरिक खूप रमलेले आहेत. अनेकदा सोशल मिडियावर खूप व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याचबरोबर अनेकांना सोशल मिडियावर फेमस सुध्दा व्हायचं असतं. त्यासाठी नागरिक वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढत असतात. आपल्याला नेहमीच सोशल मिडियावर कधी डान्स, कधी गाण्याचे तर कधी स्टंट करणारे व्हिडिओ पाहायला मिळत असतात. पण त्यातील काही व्हिडिओ इतके व्हायरल होतात की त्यांची तुफान चर्चा होत असते. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नर्सरीच्या शिक्षिका एका ट्रेनिंग दरम्यान 'ओ टमाटर बडे मजेदार' गाणं बोलत आहे.
सोशल मिडियावर व्हायरल झालेलं ओ टमाटर बडे मजेदार गाण्याने सर्वत्र लोकप्रियता मिळवली आहे. या गाण्याचे सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. व्हायरल झालेल्या या गाण्याला मोठ्यापासून लहानांपर्यंत खूप पंसती मिळाली आहे. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नर्सरीच्या शिक्षिका ओ टमाटर बडे मजेदार गाणं बोलताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शिक्षकांनी या गाण्यावर अभिनय सुध्दा केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आपण मुलांना मनोरंजनाच्या माध्यामातून शिकवू शकतो. शिक्षकांच्या या अभिनयाचे सर्वच युजर्सनीं फार कौतुक केले आहे. युजर्सनां हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आवडला आहे.
सोशल मिडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ युजर्सनां "@drnitinshakya_sdm" या अंकाउटवर पाहायला मिळेल. या व्हिडिओला युजर्सची खूप पंसती मिळालेली असून त्यांनी खूप कमेंट्स देखील केल्या आहेत. काही युजर्सनां हा व्हिडिओ आवडलेला नाही आहे. एका व्यक्तीने हे किती लाजिरवाणे आहे अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या व्यक्तीने मी सुध्दा एक नर्सरी शिक्षक आहे आणि मी त्यांच्यापेक्षा चांगले शिकवू शकतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओला ४०,०६७ लाईकस मिळाल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.