500 च्या नोटेवर अनुपम खेर? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? जाणून घ्या
Anupam KherSaam Tv

Anupam Kher: 500 च्या नोटेवर अनुपम खेर? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? जाणून घ्या

Viral News: तुमच्या खिशात असलेल्या पैशांवर गांधीजींचाच फोटो आहे ना? हे तपासून घ्या...कारण, अनुपम खेर यांचे फोटो असलेल्याही नोटा चलनात आल्यायत. खरंच खेर यांचे फोटो असलेल्या नोटा खऱ्या आहेत का...? याची आम्ही पडताळणी केली.
Published on

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत 500 रुपयांच्या नोटांवर अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो असल्याचं दिसत आहे.

फोटोवर महात्मा गांधीजी आहेत की अनुपम खेर हे लगेच ओळखताही येणार नाही, अशा या हुबेहुब खऱ्याच दिसणाऱ्या नोटा बाजारात आल्यायत. खेर यांचा फोटो असलेल्या नोटा चलनात आल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली.

500 च्या नोटेवर अनुपम खेर? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? जाणून घ्या
Viral News: भररस्त्यात महिलांचा राडा; थेट महिला कॉन्स्टेबला धू धू धुतलं; पाहा VIDEO

अनुपम खेर यांचा नोटांवर फोटो असलेला व्हिडिओ व्हायरल होत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच 500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आलाय का? बँकेचं नाव ऱिझोल्व्ह बँक का छापण्यात आलंय, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली. त्यावेळी स्वत: अनुपम खेर यांनीच ट्विट करून याबद्दल माहिती दिल्याचं आढळलं. ट्विटमध्ये अनुपम खेर म्हणाले की, तुला पाहिजे तेवढे बोल ! 500 च्या नोटेवर गांधीजींच्या ऐवजी माझा फोटो?

अनुपम खेर यांच्या ट्विटनंतर आम्ही अधिक माहिती मिळवली...त्यावेळी या सगळ्या दीड कोटींच्या बनावट नोटा गुजरात पोलिसांनी जप्त केल्याचं आढळलं. काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये प्रिंटिग प्रेसचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी 4 जणांना अटक करून 1 कोटी 20 लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. त्यामुळे त्याच रॅकेटने या नोटा छापल्याचा संशय आहे. आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं, जाणून घेऊ...

500 च्या नोटेवर अनुपम खेर? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? जाणून घ्या
Viral Video: गेंडा पिसाळला; पाठलाग करत दुचाकीस्वाराला चिरडलं; शेतात सापडलं बाईककरचं डोकं, Live Video

व्हायरल सत्य

अनुपम खेर यांचा फोटो असलेल्या नोटा बनावट आहेत. बनावट 500 रुपयांच्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो लावण्यात आला आहे. नोटेवर रिझर्व्ह बँकेऐवजी रिझोल्व्ह बँक ऑफ इंडिया छापलं आहे. बनावट नोटेचं डिझाईन हुबेहुब पाचशेच्या मूळ नोटेप्रमाणेच असल्याने ओळखता येत नाही. मोठा व्यवहार करताना नोटा तपासून घ्या.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये पोलिसांनी 1 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्यायत...या 500 रुपयांच्या नोटा असून या चलनाचे अनेक बंडल व्यापाऱ्याकडे सापडलेयत...या व्यापाऱ्याचीही फसवणूक झालीय...त्यामुळे तुम्हाला कुणी पाचशेची नोट दिली तर 10 वेळ नीट तपासून घ्या...नाहीतर तुमच्या हातातही बनावट नोट येऊ शकते...त्यामुळे आमच्या पडताळणीत 500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो असल्याचा दावा असत्य ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com