Paneer Veg Shawarma Recipe in Marathi Saam TV
लाईफस्टाईल

Paneer Shawarma Recipe: यम्मी! रेस्टॉरंट स्टाइल शोरमा घरच्याघरी कसा बनवायचा; वाचा सिक्रेट रेसिपी

Paneer Veg Shawarma Recipe in Marathi: शोरमा व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीमध्ये उपलब्ध असतो. यामध्ये वापरले जाणारे मसाले आणि विविध सॉसमुळे शोरमाची चव प्रत्येकाला हवीहवीशी वाटते.

Ruchika Jadhav

तुम्हाला नॉनव्हेज आवडत असेल किंवा व्हेज शोरमा सर्वांनीच खाल्ला असेल. फ्रँकीपेक्षा जास्त चवदार आणि टेस्टी शोरमा व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीमध्ये उपलब्ध असतो. यामध्ये वापरले जाणारे मसाले आणि विविध सॉसमुळे शोरमाची चव प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. त्यामुळे आज घरच्याघरी रेस्टॉरंट स्टाइल शोरमा कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊ.

साहित्य

  • मैदा - २ कप

  • दूध पावडर - 2 चमचे

  • साखर - 1 चमचा

  • चवीनुसार मीठ

  • बटर - 2 चमचे

शोरमाची पोळी इतर फ्रँकीच्या पोळीपेक्षा फार वेगळी असते. त्यामुळे ती नेमकी कशी बनवायची याची परफेक्ट रेसिपी माहिती असणं गरजेचं आहे. मैद्यामध्ये दूध पावडर, साखर, मीठ आणि बटर टाकून कनीक मळून घ्या. तयार झालेला कनीकपासून जाडसर पोळी लाटून घ्या. ही पोळी गॅसच्या फ्लेमवर जाळी ठेवून शेकून घ्या.

स्टफींग

  • पनीर

  • दही २ चमचे

  • मीठ चवीनुसार

  • हळद

  • व्हिनेगर 1 टेबलस्पून

  • हिरवी मिरची २ बारीक चिरलेल्या

  • उभा चिरलेला कांदा

  • लहान गाजर

  • पातळ चिरलेला कोबी

  • लसूण पेस्ट 1½ टीस्पून

  • आले पेस्ट 1½ टीस्पून

  • लाल तिखट 1½ टीस्पून

  • काळी मिरी पूड 1½ टीस्पून

  • जिरे पावडर 1½ टीस्पून

स्टफिंग तयार करण्याआधी पनीर देखील भाजून घ्यावे. त्यानंतर त्याचे बरीक तुकडे करून घ्या. त्यानंतर यात दही, मीठ, हळद, 1 टेबलस्पून व्हिनेगर, हिरवी मिरची, कांदा, गाजर, कोबी, लसूण, आलं पेस्ट, लाल तिखट, काळी मिरी पूड, जिरे पूड सर्व एकत्र करून घ्या.

मेयोनीज

  • दूध

  • व्हिनेगर

  • मीठ

  • तेल

मेयोनीज बनवताना आधी एक वाटी दूध घ्या. मिक्सरच्या भांड्यात दूध आणि मीठ मिक्स करा. त्यानंतर यात व्हिनेगर अॅड करा. तसेच एक वाटी दूध असल्यास २ वाटी तेल मिक्स करा आणि मिक्सरला फिरवून घ्या. तयार झालं मेयोनीज.

तुम्ही सोया सॉस, मेयॉनीज आणि विविध मसाल्यांनी भरलेलं स्टफींग शोरमा ब्रेडमध्ये भरा. तयार झाला तुमचा चमचमीत शोरमा. घरच्याघरी हा शोरमा बनवल्यास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच यावर ताव मारतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

Jio Recharge Plan: कमी खर्चात जास्त सुविधा! जिओचा 70 दिवसांचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन, वाचा फायदे

Bhoplyachi Bhaji Recipe : गरमागरम वडे अन् भोपळ्याच्या भाजी, संडे स्पेशल चटपटीत बेत

SCROLL FOR NEXT