Rohini Gudaghe
पुदिन्याची पाने स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्यात धुवा.
गॅसवर पातेल्यात साखर आणि पाणी टाकून पाक तयार करून घ्या.
या पाकात पुदिन्याची पाने रात्रभर भिजत ठेवा.
दुसऱ्या दिवशी पाकातुन पुदिन्याची पाने काढून घ्या.
या पाकात पाव चमचा मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करा.
चांगल्या पद्धतीने ढवळून घ्या. गाळून एका बरणीत भरा.
काचेच्या बरणीत फ्रिजमध्ये हे मिश्रण ठेवा.
सरबत करण्यासाठी २ ते ३ चमचे हा रस घ्या. त्यामध्ये हवं तितकं पाणी टाका.