Clay Pot Direction Vastu saam tv
लाईफस्टाईल

Vastu shastra tips: पाण्याचा माठ चुकीच्या ठिकाणी ठेवलाय? घरात वाढू शकतात वास्तुदोष, जाणून घ्या योग्य दिशा

Clay Pot Direction Vastu: वास्तुशास्त्रानुसार घरात माठ योग्य दिशेला ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समृद्धी वाढते. माठ ठेवण्याची योग्य दिशा आणि त्याचे फायदे जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

वास्तूशास्त्रानुसार घरात किंवा ऑफिसमध्ये पाण्याने भरलेलं मातीचं भांडं म्हणजेच माठ ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे घरातील जलतत्त्वाशी संबंधित ऊर्जेचा समतोल साधला जातो. आता शहरांमध्ये माठ फार क्वचितच दिसत असला तरी गावांमध्ये तो सर्व घरांमध्ये वापरला जातो.

माठ केवळ पाण्यासाठीच नव्हे तर तो घरातील सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. योग्य दिशेला ठेवलेला माठ घरात आनंद, शांती आणि समृद्धी आणतो. मात्र, तो चुकीच्या दिशेत ठेवल्यास वास्तू दोष निर्माण होऊ शकतात. घरात पाण्याचं हे मातीचं भांडं नेमक्या कोणत्या दिशेला असलं पाहिजे ते पाहूयात.

उत्तर दिशा

वास्तुशास्त्रानुसार, भांडं ठेवण्यासाठी सर्वात योग्य दिशा उत्तर आहे. उत्तर दिशा ही जलतत्त्वाशी संबंधित आहे. त्यामुळे घरातील जलतत्त्वाचं संतुलन राखण्यासाठी या दिशेला पाणी ठेवल्याने घरात धन, आरोग्य आणि शांती येते असं मानतात.

ऑफिसमध्ये कुठे ठेवाल माठ?

जर तुम्ही तुमच्या कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी माठ ठेवत असाल, तर तो उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या आयुष्यात स्थिरता येते आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण होते.

साकारात्मक उर्जा

घरात योग्य दिशेला ठेवलेला माठ केवळ वास्तुदोषच कमी करत नाही तर घरात शांती, आनंद आणि ऊर्जेचा संचार सुधारतो. पाण्याचा माठ हा नियमितपणे स्वच्छ करा आणि ते नेहमी ताज्या पाण्याने भरा. जेणेकरून तुमचं आरोग्यही चांगलं राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी डाव टाकला, पण काँग्रेस ट्विस्ट आणणार; सपकाळ थेट दिल्लीत पोहचले, उमेदवार उतरवणार का?

Lakshmi Narayan Yog 2026: मे महिन्यात बनणार लक्ष्मी नारायण राजयोग , या ४ राशींच्या नशीबात येणार आनंद

Dhirubhai Ambani : धीरुभाई अंबानींचा पहिला व्यवसाय कोणता अन् पहिला पगार किती होता?

Delhi High Court: हायकोर्टात सुनावणीवेळी सुरू झाला अश्लिल व्हिडिओ, न्यायाधीशांसह सगळ्यांनाच बसला धक्का

Maharashtra News Live Update: पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब सापडल्याने खळबळ; NIA कडे तपास

SCROLL FOR NEXT