Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : घरात फिश टँक ठेवणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगते? जाणून घ्या

Fish Aquarium At Home : आपल्यापैकी अनेकांच्या घरात फिश टँक पाहायला मिळते. परंतु, वास्तुशास्त्रानुसार फिश टँक ठेवणे शुभ आहे की अशुभ हे अनेकांना माहित नाही. तसेच फिश टँक घरात ठेवत असाल तर त्याची योग्य दिशा कोणती हे जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Fish Aquarium:

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचे विशेष महत्त्व आहे. आपल्या घरात ठेवली जाणारी वस्तू ही प्रत्येक दिशा आणि कोना हा अधिक महत्त्वाचा आहे. परंतु, यामुळे घरात बरेचदा नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो.

आपल्यापैकी अनेकांच्या घरात फिश (fish) टँक पाहायला मिळते. परंतु, वास्तुशास्त्रानुसार फिश टँक ठेवणे शुभ आहे की अशुभ हे अनेकांना माहित नाही. तसेच फिश टँक घरात ठेवत असाल तर त्याची योग्य दिशा कोणती हे जाणून घेऊया.

वास्तुनुसार फिश टँक घरात (Home) ठेवल्यास घराचे सौंदर्य वाढतेच शिवाय जीवनात सुख-समृद्धीही येते. फिश टँक ठेवताना वास्तूशी संबंधित काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. घरामध्ये फिश टँक ठेवण्यासाठी, योग्य दिशा आणि माशांची संख्या यासह वास्तूचे (Vastu) नियम पाळले पाहिजेत.

फिश टँक घरात ठेवल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते. तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढतो. तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाचा मार्ग सुकर होतो. तसेच कर्जासंबंधित अनेक गोष्टी मार्गी लागतात. जर तुम्ही देखील घरात फिश टँक ठेवत असाल योग्य दिशा कोणती जाणून घेऊया.

  • वास्तुनुसार फिश टँक घराच्या किंवा ऑफिसच्या उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवता येते.

  • घराच्या उत्तर दिशेला फिश टँक ठेवल्याने करिअरमध्ये प्रगतीच्या भरपूर संधी उपलब्ध होतात. तसेत घराच्या पूर्व दिशेला ठेवल्यास जीवनात आनंद मिळतो.

  • वास्तुनुसार बेडरुममध्ये फिश टँक ठेवू नका. तसेच फिश टँकमध्ये ८-९ मासे ठेवणे शुभ मानले जाते.

  • स्वयंपाकघरात फिश टँक ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मकता वाढते. तसेच यातील पाणी वेळोवेळी बदलायला हवे.

  • वास्तुनुसार फिश टँकमध्ये गोल्डन फिश, फ्लॉवर हॉर्न आणि एंजेल फिश ठेवणे शुभ मानले जाते. घराच्या दक्षिण दिशेला फिश टँक ठेवणे शुभ मानले जात नाही.

  • तसेच वास्तुनुसार ८ सोनेरी माशांसह एक काळा मासा पाळणे शुभाचे प्रतीक आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT