वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा आणि कोना हा अधिक महत्त्वाचा असतो. परंतु, अनेकदा घरात नकारात्मकता येते, पैशांची चणचण भासते. त्यामुळे घरात नकारात्मकतेचा सामना करावा लागतो.
वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) जर तुम्हालाही घरात नकारात्मकता जाणवत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तसेच घरात काही बदल ही करायला हवे. ज्यामुळे सकारात्मकता टिकून राहिल. आर्थिक (Money) संकंटापासून सुटका होईल. जाणून घेऊया वास्तुचे नियम (rules)
घरात सूर्यदेवतेसह सात घोड्यांचे चित्र लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. हे चित्र घराच्या पूर्व दिशेला लावावे. तसेच हॉलमध्ये कुटुंबाचा फोटो लावल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतात आणि सकारात्मकता वाढते.
वास्तुशास्त्रात तुळशीच्या रोपाला अधिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात तुळशीला पूजनीय मानले जाते. यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. त्यासाठी घराच्या अंगणात उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला तुळशीचे रोपटे लावावे. या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरातील नकारात्मता दूर होईल. तसेच घरातील वातावरण आनंदी राहिल.
घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी सुंगधित अगरबत्ती किंवा धूप जाळू शकता. असे केल्याने घरात वातावरण प्रसन्न राहाते. झोप देखील चांगली लागते.
घोड्याची नाळ वास्तुशास्त्रात अधिक शुभ मानली जाते. जर तुम्ही घरामध्ये घोड्याची नाळ लावली तर अनेक प्रकारच्या नकारात्मकतेपासून लांब राहाल. वास्तुनुसार घोड्याची नाळ ही घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी. तसेच काळ्या घोड्याची नाळ शुभ मानली जाते. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.