Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात या दिशेला ठेवा पाण्याचे मडक, नांदेल सुख-समृद्धी

Vastu Tips For Positivity : हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अधिक महत्त्व आहे. शास्त्रानुसार घरातील सर्व वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा सांगण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तू योग्य दिशेला ठेवल्याने व्यक्तीचे जीवन आनंदी होते.
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात या दिशेला ठेवा पाण्याचे मडक, नांदेल सुख-समृद्धी
Published On

Vastu Tips On Earthen Pots :

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अधिक महत्त्व आहे. शास्त्रानुसार घरातील सर्व वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा सांगण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तू योग्य दिशेला ठेवल्याने व्यक्तीचे जीवन आनंदी होते.

उन्हाळा सुरु झाला की, आपल्यापैकी अनेकांच्या घरात मातीचे मडके पाहायला मिळतात. यातील पाणे हे शरीरासाठी अधिक फायदेशीर असते असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की, घरामध्ये (Home) पाण्याचे भांडे योग्य दिशेला ठेवल्यास व्यक्तीला जीवनात नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो. त्यामुळे भांडे योग्य दिशेने न ठेवल्यास व्यक्तीला जीवनात नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो. त्यामुळे भांडे घराच्या शुभ दिशेला ठेवावे. घरातील कोणत्या दिशेला पाण्याचे मडके ठेवायला हवे जाणून घेऊया.

1. या दिशेला ठेवा

  • वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) पाण्याचे मडके हे नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला म्हणजेच घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. असे मानले जाते की, ही दिशा गुरु ग्रहाची असते. या दिशेला पाण्याचे मडके ठेवल्याने मुलांचा शारीरिक विकास होण्यास मदत होते. तसेच मुलांच्या करिअरमध्येही (Career) वाढ होते.

  • मडके नेहमी झाकून ठेवावे. यावर प्लास्टिकचे झाकण ठेवू नका. त्याऐवजी मातीचे झाकण वापरावे. यातून आरोग्याला अधिक फायदे मिळतात.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात या दिशेला ठेवा पाण्याचे मडक, नांदेल सुख-समृद्धी
Vastu Tips : बिझनेस सुरु करण्यापूर्वी या वास्तू टिप्स लक्षात ठेवा, कामात मिळेल यश
  • योग्य दिशेला मातीचे मडके ठेवल्याने लक्ष्मी देवी निवास करते. यामुळे आर्थिक लाभ होतात असे म्हटले जाते. तसेच आर्थिक संकटातून सुटका होते. माठ कधीही रिकामा ठेवू नका.

  • वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला देवी-देवतांचा वास असतो. नेहमी पाण्याने भरलेले भांडे ठेवल्याने देवी-देवता प्रसन्न होतात. तसेच घरात सुख-समृद्धी नांदते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com