Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : नवीन वर्षापूर्वी घरातून या वस्तू फेकूनच द्या! अन्यथा करावा लागेल दारिद्रयाचा सामना

Vastu Tips For New Year : वास्तूदोषाचा माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो. वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा आणि त्याचा कोना महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागेल त्यासाठी नवीन वर्षापूर्वीच घरातील या वस्तू फेकून द्या. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Home :

वास्तूशास्त्रानुसार घरातील वास्तू बरोबर नसेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वास्तूदोषाचा माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो. वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा आणि त्याचा कोना महत्त्वाचा असतो.

घरात (Home) नकळतपणे आपण अशा काही गोष्टी ठेवतो ज्याचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा संचारते. अशुभ गोष्टी घरात घडू लागतात. त्यामुळे तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागेल त्यासाठी नवीन वर्षापूर्वीच घरातील या वस्तू फेकून द्या. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. सुकलेली झाडे

घरामध्ये सुकलेली झाडे ठेवणे शुभ मानले जात नाही. त्याचबरोबर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात काटेरी झुडपे ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, ज्याचा आपल्यावर परिणाम होतो.

2. बंद पडलेल घड्याळ

बंद पडलेल घड्याळ कधीही भिंतीवर लावू नका. सकाळी उठल्यावर बंद घड्याळ पाहिल्याने नशिबावर परिणाम होतो असे म्हटले जाते. तसेच घराच्या कोणत्याही कोपऱ्यात बंद घड्याळ ठेवणे शुभ मानले जात नाही. मनगटावरही बंद घड्याळ घालू नये.

3. तुटलेली- फाटलेली चित्रे

घराला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी अनेक रंगीबेरंगी चित्रे लावतात. परंतु, घरात तुटलेली किंवा फाटलेली चित्रे लावू नका. त्यामुळे कुटुंबात वाद निर्माण होतो. तसेच भांडणाचे किंवा युद्धाचे चित्र (Photo) घरात लावू नका.

4. तडा गेलेली काच

तुटलेली काच किंवा आरसा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवू नये. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे घरात मोठे संकट येऊ शकते. त्यामुळे आरोग्यावरही (Health) परिणाम होतो.

5. जुने किंवा फाटलेले कपडे

अनेक वेळा आपण जुने किंवा फाटलेले कपडे घालतो ज्यामुळे त्याचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे वास्तूदोष तयार होतो. तसेच इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT