Christmas निमित्त जुळून आला शुभ संयोग! मेषसह या ५ राशींना मिळणार सरप्राइज गिफ्ट्स

Christmas Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला नाताळ साजरा केला जाईल. या दिवशी रुचक राजयोग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, शुभ योग आणि शुक्ल योग यांचा शुभ संयोग तयार होत आहे.
Christmas Horoscope
Christmas HoroscopeSaam tv
Published On

Top 5 Most Luckiest Zodiac Sign :

ज्योतिषशास्त्रानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला नाताळ साजरा केला जाईल. या दिवशी रुचक राजयोग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, शुभ योग आणि शुक्ल योग यांचा शुभ संयोग तयार होत आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार पाच राशींना शुभ योगामुळे फायदा होणार आहे. कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल. या राशींना आश्चर्यकारक भेटवस्तू मिळतील. जाणून घेऊया पाच राशींबद्दल.

1. मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा चांगला जाणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. मालमत्ता आणि वाहन खरेदी करु शकतील. व्यवसायात (Business) फायदा (Benefits) होतील.

Christmas Horoscope
Meen Rashi 2024 : नव्या वर्षात मीन राशीवर येणार मोठं संकट! करिअरमध्ये करावा लागणार अडचणीचा सामना, प्रवास करणे टाळा

2. कर्क

अमृत सिद्धी योगामुळे आनंदाचा दिवस असेल. संवाद कौशल्य सुधारेल. त्याचे सोशल नेटवर्क वाढवण्यात यशस्वी (Success) होतील. करिअरच्या दृष्टिकोनातून काही आव्हानांना सामोरे जावे लागेल.

3. तूळ

जोडीदारासोबत संवाद साधाल. गिफ्ट्सही मिळेल. नवीन मालमत्ता खरेदी करु शकता. आरोग्य चांगले राहिल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक वातावरण सुधारण्यासाठी शांत मनाने काम कराल.

Christmas Horoscope
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार नवीन वर्षात या दिशेला लावा घोड्याची नाळ, पैशांची चणचण होईल कमी; शनिदेवाची राहिल कृपा

4. वृश्चिक

अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतील. सर्वजण तुमच्या विनोदी शैलीने सभोवतालचे वातावरण आनंददायी राहिल. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात चांगला नफा मिळेल.

5. कुंभ

कामात अधिक सक्रिय राहिल. वेगाने प्रगती कराल. आर्थिक स्थितीत अधिकाधिक पैसे कमवाल. प्रेमात यश मिळेल. गोड बोलून जोडीदाराचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल. पालकांना काही खास भेटवस्तू द्याल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com