Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार नवीन वर्षात या दिशेला लावा घोड्याची नाळ, पैशांची चणचण होईल कमी; शनिदेवाची राहिल कृपा

Vastu Tips For Home : वास्तुशास्त्रानुसार दिशांचे महत्त्वाचे सांगितले आहे. घरातील प्रत्येक दिशा ही सकारात्मक असते. जर काही गोष्टी योग्य ठिकाणी ठेवल्या तर त्याचे परिणाम देखील शुभ मिळतात.
Vastu Tips
Vastu TipsSaam Tv
Published On

Vastu Tips For Horseshoe :

वास्तुशास्त्रानुसार दिशांचे महत्त्वाचे सांगितले आहे. घरातील प्रत्येक दिशा ही सकारात्मक असते. जर काही गोष्टी योग्य ठिकाणी ठेवल्या तर त्याचे परिणाम देखील शुभ मिळतात.

नवीन वर्षात जर तुम्हालाही घरात (Home) सुख-समृद्धी हवी असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. वास्तूशास्त्रानुसार काळ्या घोड्याची नाळ घरात बसवणे खूप शुभ मानले जाते.

असे म्हटले जाते की, यामुळे डोळ्यातील दोषांपासून आराम मिळतो. घरात सुख, समृद्धी येते. कुटुंबातील (Family) सदस्यांचे आरोग्य चांगले राहाते आणि जीवनातील सर्व दु:ख, अडथळे आणि संकटांपासून मुक्ती मिळते.

Vastu Tips
Meen Rashi 2024 : नव्या वर्षात मीन राशीवर येणार मोठं संकट! करिअरमध्ये करावा लागणार अडचणीचा सामना, प्रवास करणे टाळा

घरात घोड्याची नाळ बसवल्याने सुख-शांती तर मिळतेच शिवाय आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळते. परंतु, वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) घरात घोड्याची नाळ बसवताना काही वास्तूचे नियम पाळायला हवेत. जाणून घेऊया त्याबद्दल.

घोड्याची नाळ लोखंडाची असते. ही नाळ दोन आकारात येते. एक यू शेपमध्ये आणि दुसरा रिव्हर्स यू शेपमध्ये. वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये घोड्याची नाळ लावणे शुभ मानले जाते.

Vastu Tips
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार डायनिंग टेबलवर या गोष्टी चुकूनही ठेवू नका, अन्यथा...

1. घोड्याची नाळ कोणत्या दिशेला ठेवाल?

  • वास्तूशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला काळ्या घोड्याची नाळ ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे पैशांची आर्थिक चणचण भासणार नाही.

  • घराचे मुख्य प्रवेशद्वारे दक्षिण किंवा पूर्व दिशेला असेल तर घोड्याची नाळ उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे टाळा.

  • आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घोड्याच्या उजव्या पायाची दोरी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावता येईल. यामुळे पैशांसंबंधीत असणाऱ्या अनेक अडचणी दूर होतील.

  • घर आणि ऑफिसमध्ये यू आकाराचा नाळ लावणे अधिक शुभ मानले जाते. ज्यामुळे व्यापारात अधिक फायदा होईल.

  • ऑफिसमध्ये काळ्या घोड्याची नाळ ठेवल्याने व्यापारात वाढ होते. तसेच पैसे टिकून राहाण्यास मदत होते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com